नांदेड| काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा नोव्हेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेच्या यशस्वीतेसाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते आ. अमरनाथ राजूरकर, आ. जितेश अंतापूरकर, माजी आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ. अविनाश घाटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी महापौर बलवंतसिंह गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, स्थायी समितीचे माजी सभापती मसूदखान, काँग्रेस नेते मारोतराव कवळे, जि.प.च्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. मीनलताई खतगावकर, प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.