'शिंदे गट 'केवळ शिवसेना संपविण्या करिताच /माजी खा सुभाष वानखेडे ...
हदगाव, शे.चांदपाशा| राज्यात शिवसेनेला संपविण्याकरिताच शिंदे गट स्थापण झाला. किती संकटे आली तरी कोणी माईचा लाल शिवसेनेला संपवू शकत नाही. अस प्रतिपादन शिवसेनेचे माजी खा .सुभाष वानखेडे यांनी केले.
ते हदगाव शहरातील शिव पार्वती मंगलकार्यालयात हदगाव हिमयतनगर विधानसभा क्षेञातील जेष्ठ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भरगच्च बैठकीत केलं. या बैठकीला शिवसेनेच्या मेळाव्याच स्वरुप प्राप्त झालं होत. यावेळी काँग्रेसच्या महीला पदाधिका-यांनी आपल्या महीला कार्यकर्ते सोबत सेनेत प्रवेश केला. या बैठकीला मार्गदर्शन करतांना माजी खा. वानखेडे पुढे म्हणाले की, शिवसेनेत अतर्गत वादामुळे मी काँग्रेस मध्ये गेलो होतो. सागतांना ते म्हणाले की, शिवसेनेतुन मी काँग्रेसमध्ये गेलो तरी शिवसेनेचे नुकसान केले नाही.
तरी पण माझ्यामुळेच काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. हे पाप माझ्यामुळे झालं अशी स्पष्ट कबूली ही त्यांनी यावेळी दिली. सेनेचे माजी आ. नागेश पा.आष्टीकर यांना मी 'वचन 'दिल्यामुळेच मी शिवसेनेच्या विरोधात कधी ही माझ्या सात वर्षाच्या काळात माझ्या कार्यकर्ते व चाहत्यांना आदेश दिलेला नव्हता की, सेनेच्या उमेदवाराला पाडा. म्हणून परिणाम स्वरुप बहुसंख्यने आज हदगाव विधानसभा क्षेञांत न.पा. ग्रामपंचायत सहकारी सोसायटी आदी शिवसेनेच्या ताब्यात आहेत अस ही त्यांनी सागितले.
'माझ्य काळात 'अवैध धंदे बंद होते..
मी जेव्हा हदगाव विधानसभाक्षेञाच नेतृत्व करीत होतो तेव्हा माझ्या १५ वर्षाच्या कार्यकाळात अवैध धंदे करणारे गायब होते तर काही कामाच्या शोधात होते. आता तर हेच अवैध धंदे करणारे हदगाव व हिमायनगर तालुक्यात चांगलेच बस्तान माडलेले असुन, गल्ली बोळा पासुन ते तालुक्याच्या प्रत्येक गावात मटका गुटखा अवैध दारु खुलेआम सुरु झाले आहे. अनेकांचे संसार उद्वस्त झालेले असुन मटकाकिंग 'कोट्याधीश' झालेल आहे.
काँग्रेसच्या महिला पदाधिकारी शिवसेनेत
या जेष्ठ शिवसैनिकाच्या मेळाव्यात काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आश्विनी गीरी ह्या आपल्या महीला काँग्रेसच्या कार्यकर्तेसह शिवसेनेत प्रवेश केला. जेष्ठ शिवसेनेच्या कार्यकर्तेच्या बैठकीत हदगाव तालुक्याचे प्रथम माजी शिवसेना तालुका अध्यक्ष लक्ष्मण लकडे याच सत्कार माजी खा सुभाष वानखेडे यांनी केला. विशेष म्हणजे लक्ष्मण लकडे यांनी सर्वात प्रथम हदगाव तालुक्यात १९८६ दरम्यान स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रथम शिवसेना तालुका प्रमुख होण्याचा माण मिळाला होता.