१०८ चे डॉक्टरच धावले मदतीला
अर्धापूर, निळकंठ मदने| येथील ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी गेलेल्या महिलेला थेट डॉक्टरांनी नांदेडला पाठवून दिले,अन् ती महिला रुग्णालयाच्या १०८ गाडीतच प्रस्तूती झाली, १०८ गाडीच्या डाॅक्टरांनीच त्या महिलेची प्रस्तुती केली.
करोडो रुपयांच्या निधीतून अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची टोलेजंग इमारतीमध्ये अत्यंत गरजू रुग्णांचा गरज असतांना ईलाज न करता थेट नांदेड ला पाठवून येथील रुग्णालया चे मस्तकाला डॉक्टर आपली जबाबदारी झडकून केवळ दिवस काढण्याचे काम करीत असल्याचा प्रत्यय बीधवारी तालुकावासीयांना आला.
अर्धापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अर्धापूर ला ग्रामीण रुग्णालयाची ईमारत व्हावी,या टोलेजंग इमारतीमध्ये तालुक्यातील रुग्णांचा अर्धापूरातच ईलाज झाल्यास रुंग्णाचा वेळ व पैशाची बचत होईल व मतदारसंघात मुलभुत सोयीसुविधा होतील त्यामुळे येथे पाठपुरावा करुन टोलेजंग ग्रामीण रुग्णालयाची उभारणी केली,येथे मोठा रस्ता होऊन सर्व सुविधा होण्यासाठी प्रयत्न केले,पण येथील कुंभकर्णी झोपेत असलेल्या डॉक्टरांनी कामचुकार पणाचा अक्षरक्ष कळस गाठला आहे,२८ सप्टेंबर बुधवारी सकाळी बाळंतपणासाठी अर्धापूर शहरातील एक महिला जमीलाबी मुस्तफा खान वय (३०) रा.बसस्थानक परीसर, ही महिला नऊ महिने पुर्ण झाल्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी आली,तीला रितसर प्रवेश करुन तपासणी केली.
पण येथे बाळंतपण होणार नाही, नांदेडला बाळंतपणासाठी जा म्हणून येथील डॉक्टरांनी या महिला रुग्णास नांदेड ला पाठविले,अत्यंत गरज असतांना या महिलेस तब्बल वीस किमी खड्ड्यांचा प्रवास करीत नांदेडला पाठविले. पण दाभड येथे १०८ मधून ही महिला जात असतांना तिला असय्य वेदना जाणवू लागल्या. आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद शिंदे व मदतनीस चालक रणधीर लंगडे यांनी या महिलेची प्रस्तुती केली. यावेळी रस्त्यावरील जाणाऱ्या महिलांची मदत घेतली. या महिलेस सुंदर मुलगी झाली. या महिलेस व बाळास १०८ गाडीने नांदेड येथील श्याम नगरच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
अर्धापूरच्या ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या महिलांना नांदेडला पाठविण्याचा सपाटाच येथील डॉक्टरांनी लावला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रापेक्षाही कमी बाळंपण ग्रामीण रुग्णालयात होतात अशी चर्चा आहे,येथील डॉक्टर सेवेमध्ये कमी पडतात हे वास्तव आहे. ज्या उद्देशाने या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली,तो उद्देश कामचुकार डॉक्टरामुळे पुर्ण होत नाही. कारण एखादी चौकशी लागते,कोणीतरी राजकीय शिफारस करुन या डॉक्टरांना राजाश्रय देतो यामुळे तालुक्यातील रुग्णांना न्याय मिळेल काय? अशी तालुक्यात उघड चर्चा आहे.
बुधवारी सकाळी ४ वा.ही महिला रुग्णालयात आली,तिच्यावर उपचार केले. शरीरात ७ हिमोग्लोबीन असल्याने पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेत सोबत आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी देऊन नांदेड़ला पाठविले,अशी प्रतिक्रिया "नांदेड न्यूज लाईव्ह' शी बोलतांना वैद्यकीय अधिकारी डॉ अरविंद फिस्के यांनी दिली.