नवीन नांदेड। विजया दशमी दसरा निमित्ताने भारतीय जनता पार्टी सिडको मंडळाच्या वतीने दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता उस्मानगर रोडवरील वाघाळा पाटीजवळील मोकळ्या मैदानात रावण दहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्याला नांदेड जिल्हायांचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीती राहणार असल्याची माहिती संयोजक भाजपा सिडको मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख यांनी दिली.
भाजपा सिडको मंडळ आयोजित रावण दहण हिंगोली येथील कारागिरांनी केलेल्या ५२ फुटी असलेल्या दहा तोंडी रावणाचे दहन होणार असून या प्रसंगी ढोल ताशाचा गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये हा सोहळा होणार असून नांदेड जिल्ह्याचे लोकनेते, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले, युवा नेते ,जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे,दिलीप कंदकुर्ते, डॉ.संतुकराव हंबर्डे,अॅड. चैतन्यबापू देशमुख, जनार्धन ठाकुर, बाळू खोमणे, मिलींद देशमुख. बालाजी पाटील पुणेगावकर, विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, माजी सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर, दिलीप ठाकूर, विजय गंभीरे, अशोकमामा धनेगावकर, व्यंकट मोकले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, नगरसेविका इंदुताई घोगरे, बेबीताई गुपिले,
माजी नगरसेवक राजू गोरे, संदीप पाटील चिखलीकर, अभिषेक सौदे,संतोष वर्मा, जनार्धन गुपीले, धिरज स्वामी, शितल खांडील, गजानन कत्ते, निखीलेश देशमुख, सिध्दार्थ धुतराज, चंचलसिंघ जट,विजया गोडघासे, गिरीष डहाळे, विठ्ठल घाटे, विशाल गडंबे, राजेंद्र जुजारे, कल्याण यजगे, सुनिल पाष्टेकर, पराग श्रोते,महेंद्र तरटे यासह मान्यवरांच्यी उपस्थितीती राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा सिडको मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भुजंग मोरे, प्रमोद रेवणवार, प्रभाकर जाधव, दत्ता वरपडे, आनंद दासरवार, महेश वल्लावार, मोनू जोशी, शिवा निलावार, नारायण वडवळे, बंडू जोशी, निलेश पेन्शलवार आदि परिश्रम घेत आहेत.