जवाहेरूल उलूम उर्दू शाळेत सायकल वाटप कार्यक्रम
किनवट, माधव सूर्यवंशी| मानव विकास कार्यक्रमांतर्गत मुलींना मोफत सायकली देण्यात येत आहेत . यामुळे बचत झालेल्या वेळेचा सदुपयोग करून आपलं उज्ज्वल भवितव्य घडवावं. गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठं होऊन आपला तालुका, विभाग व राष्ट्राच्या हितासाठी आपलं आयुष्य समर्पित करावं. असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
येथील जवाहेरूल उलूम उर्दू हायस्कूलमध्ये मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता 8 वी ते 12 मध्ये शिकणाऱ्या 123 मुलींना सायकल वाटप कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. माजी नगराध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष हाजी ईसाखान सरदारखान हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र जाधव, केंद्र प्रमुख रमेश राठोड , मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे , संस्थेचे सदस्य अल्लाबक्ष चव्हाण व युसूफ खान उपस्थित होते.
या कार्यक्रमाचं औचित्य साधून या शाळेतील शिक्षक युसूफखान दुलेखान यांना सेवानिवृत्तीचा निरोप देण्यात आला. मुख्याध्यापिका अस्माखातुन अब्दुल गफार यांनी प्रास्तविक व शेख इब्राहीम यांनी सूत्रसंचालन केले. इम्रान खान यांनी आभार मानले. कार्यक्रमास फजल चव्हाण, जवाहेरूल उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एम.ए .सामी, नसिर तगाले, आमदारांचे स्वीय सहायक निळकंठ कातले व जनसंपर्क अधिकारी संतोष मरस्कोल्हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक शेख युनूस, इशरत अहेमद, मोहम्मद तलीम, मोहम्मद साजीद, नसरूल्ला खान, मोहम्मद अतिक, काजी शाकीर, मो. जहिरोद्दीन चव्हाण , मिर्झा निशाद बेग , शमीमबानो, तरन्नूम जहाँ व फरहीन आदींसह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
"जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सह अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या मार्ग दर्शनाखाली नियोजन अधिकारी सु. आ. थोरात व शिक्षाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर यांनी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात किनवट तालुक्यातील 22 शाळांतील 609 विद्यार्थिनींना मानव विकास कार्यक्रमांतर्गत सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. एकट्या उर्दू शाळेचं उदाहरण घेऊया , पूर्वी 8 वीत 40 मुली होत्या. मानव विकास योजनेतून सायकल मिळाल्याने आज ह्या वर्गात 90 मुली शिकताहेत. अल्पसंख्याक समाजातील मुलींची ही वाढ या योजनेचं फलित आहे. -अनिल महामुने, गट शिक्षाधिकारी, पं.स., किनवट