पत्रकार कृष्णा उमरीकर, शिवाजी राजूरकर, जी.पी. मिसाळे, लेखिका रुपाली वागरे यांच्यासह २० जणांचा समावेश; कवी महेंद्र नरवाडे, ज्येष्ठ विधीज्ञ राजकुमार शूरकांबळे यांना विशेष पुरस्कार
नांदेड| डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने दिले जाणारे फुले- आंबेडकरी विचारधारा पुरस्कार ५ व्या फुले- आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा संमेलनाचेे मुख्य संयोजक अशोक मल्हारे, सल्लागार एन.डी. गवळे, सहसंयोजक प्रभाकर ढवळे, स्वागताध्यक्ष प्रा.डॉ. सा.द. सोनसळे, संयोजन समितीचे अध्यक्ष मारोती कदम, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, सचिव नारायण अंबुरे, सहसचिव नागोराव डोंगरे यांची उपस्थिती होती.
सन २०२०-२१ व २०२१-२०२२ या वर्षाकरीता एकुण २० पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच दोन विशेष पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. यात कृष्णा दामोदर उमरीकर (उत्कृष्ट पत्रकारीता गौरव पुरस्कार), शिवाजी राजूरकर (मूकनायक पत्रकारिता पुरस्कार), जी.पी. मिसाळे (मराठवाडा विकासरत्न पुरस्कार), रुपाली वागरे (उत्कृष्ट लेखिका पुरस्कार), हर्षली तेलंगे (उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार), साहित्यिक बाबुराव पाईकराव (उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार), डॉ. दिलीप लोखंडे (समाजसेवा पुरस्कार), भानुदास बेल्लाळे (फुले शिक्षण सेवा पुरस्कार), अर्जुन चौदंते (धम्मसेनानी राजा ढाले पुरस्कार), विनोदकुमार कनकुटे (आदर्श शिक्षक गुरुगौरव पुरस्कार), उल्हास काटे (उत्कृष्ट शिक्षक गुरु गौरव पुरस्कार), बाबाराव सोनकांबळे (समाजप्रबोधन पुरस्कार), बाबु गजभारे (धम्मभूषण पुरस्कार), सोपान कांबळे (समाजरत्न पुरस्कार), विठ्ठल कांबळे (कोविड योद्धा पुरस्कार), राजू वाघमारे (यशस्वी उद्योजक पुरस्कार), शंकर शिंदे (समाज भूषण पुरस्कार), संतोष घटकार (उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार), बालाजी कांबळे (उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार), व्यंकटराव गजभारे (नामांतर योद्धा पुरस्कार) यांचा समावेश आहे. तसेच विशेष पुरस्कारामध्ये महेंद्र रामचंद्र नरवाडे (साहित्य चळवळ पुरस्कार), ऍड. राजकुमार शूरकांबळे (कामगार विधीतज्ज्ञ पुरस्कार) यांची निवड करण्यात आली आहे.
सदरील पुरस्कार २५ सप्टेंबर रोजी कुसूम सभागृहात होणार्या ५ व्या फुले- आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलनात देण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरुप मानाचा फेटा, पदक, मानचिन्ह, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे स्वरुप आहे. संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक तुकाराम टोम्पे, संयोजन समितीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. गजानन देवकर, संभाजी मल्हारे, सुरेश डोंगरे, दिलीप एंगडे, एन.एम. झडते, ऍड. रामराव मल्हारे, बी.एम. मल्हारे, वंदना मल्हारे, साईनाथ रहाटकर, भैय्यासाहेब गोडबोले, आनंद गोडबोले, शिवाजी पवळे, प्राचार्य ए.एस. जाधव, प्रा. रामचंद्र वाघमारे, शंकर गच्चे, सुभाष लोखंडे, ऍड. कुणाल गवळे, संभाजी पवळे, आकाश मल्हारे, महेंद्र पवळे, मधुकर दुधमल, केशव गायकवाड, विशालराज वाघमारे, मनिष पवळे, दामोधर ढवळे, अरुण कांबळे, दशरथ चावरे यांनी केले आहे.