केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेला प्रतिसाद -NNL


नांदेड।
जिल्हा परिषद  व पंचायत समिती लोहा यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर  यांच्या संकल्पनेतून व गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांच्या मार्गदर्शनानुसार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा अंतर्गत शेवडी बा . तालुका लोहा येथे केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात पाच शाळांचा सहभाग होता. जि. प . के. प्रा .शा शेवडी , बा . , प्रा. शा . दगडगाव, प्रा. शा. बेटसांगवी क्र . 1 ,  जि . प.  हा.पेनूर  ,  प्रा.  शा . शेवडी तांडा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या ज्ञानाची परीक्षा आजमावली.

सदरील स्पर्धेत प्रश्नाच्या तीन फेऱ्या घेण्यात आल्या . पहिल्या फेरीत पर्याययुक्त प्रश्न  विचारण्यात आले. दुसऱ्या फेरीत संमिश्र विषयावर प्रत्येकी तीन पर्यायमुक्त प्रश्न  विचारण्यात आले तिसऱ्या व अंतिम फेरीत शीघ्र गतीने प्रश्नाची विचारणा करून गुणदान देण्यात आले. यामध्ये जि . प . प्रा. शा . बेटसांगवी क्र.1 येथील गटाने प्रथम क्रमांक पटकावला तर जि . प.  हा. पेनूर येथील गटाने द्वितीय व जि . प. प्रा. शा .दगडगाव या शाळेने अनुक्रमे तिसरा क्रमांक पटकावला . विजेते व सहभागी स्पर्धकास केंद्रप्रमुख नागोराव जाधव यांच्यातर्फे पुष्प व पेन देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक आनंदा नरवाडे  प्रमुख पाहूणे म्हणून केंद्राचे केंद्रप्रमुख  नागोराव जाधव व पेनुरचे पालक  चांदणे, श्री गवते, श्री एडके हे उपस्थित होते.  या   कार्यक्रमाचे आयोजन  चंद्रकांत लामदाडे ,   नादरगे, अंबाटे, भालेराव, मालू जाधव, कदम,  पारेकर यांनी केले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी