विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन
नांदेड, अनिल मादसवार| किशोरवयीन मुलं-मुली जर डॉक्टरांचा सल्ला नसतांनाही वारंवार खोकल्याचे औषध व इतर औषधी खरेदी करत असतील तर त्यावर केमीस्ट व ड्रगीस्ट यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वनस्पतीची लागवड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. याची कोणत्याही स्वरुपात जर कुठे विक्री होतांना कोणाच्या जर तसे निदर्शनास आले तर त्याबाबत नागरिकांनी तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी, असे स्पष्ट प्रतिपादन न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव डी. एम. जज यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्यावतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन स्कॉलर्स कॉमर्स क्लासेस नवीन मोंढा नांदेड येथे करण्यात आले होते. या शिबिरात त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांना ॲण्डी रॅगींग अॅक्ट, ट्राफिक रुल्स, ॲसिड अॅटक व अंमली पदार्थामुळे पीडीत व्यक्तींना विधी सेवा सहाय्य आणि अंमली पदार्थाचे निर्मूलन योजना 2015 या बाबत कायदेविषयक माहिती देण्यात आली.
मेडिकल स्टोअर्स चालकांच्या सतर्कतेमुळे किशोरवयीन मुला-मुलींना अंमली पदार्थाच्या सेवनाच्या आहारी जाण्यापासून रोखता येते हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. युवा पिढीला अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून रोखण्याचे हे महत्वपूर्ण कार्य आहे. यात नागरिक अधिक सजगता बाळगतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव डी. एम. जज यांनी व्यक्त केला.यावेळी सहाय्यक प्रादेशीक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम याबाबत, दिपाली डी. डोणगावकर, यांनी ॲन्टी रॅगींन ॲसिड अटॅक याविषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन प्रा. सौरभ अग्रवाल यांनी केले तर आभार जीवन इन्नानी यांनी मानले.