नांदेड| ‘सही पोषण देश रोषण’ या कार्यक्रमातर्गत असर्जन येथील अंगणवाडी क्र. 7 व 8 च्या वतीने पोषण रॅली काढण्यात आली. या रॅलीत असंख्य चिमुकले विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभुषेत सहभागी झाले.
दि. 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत ‘सही पोषण देश रोषण’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज दि. 14 सप्टेंबर रोजी एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत अधिकारी मिलिंद वाघमारे व मुख्यसेविका शकुंतला पेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमुख उपस्थितीत असर्जन येथील अंगणवाडी क्रं. 7 व 8 च्या वतीने पोषण रॅली काढण्यात आली.
यावेळी पोलीस पाटील खंडेराव बकाल, शालेय समिती अध्यक्ष दिगंबर वैद्य, नंदु वैद्य, रामजी रगडे, साबळे, शिक्षक राजेश जांभळे, मारोती सुर्यवंशी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध वेशभुषेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांची कडधान्य व भाजीपाला घेऊन पोषण रॅली काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकला गाढे, सुरेखा साबळे, आम्रपाली परघणे, संगीता वैद्य यांनी परिश्रम घेतले.