अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माळोदे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शिक्षक जयवंत काळे यांचा " शिक्षकदिनी " सत्कार -NNL

उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथील  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त जयवंत काळे यांचा मुख्यमंत्री संवाद कार्यक्रमात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी मंडळींच्या उपस्थितीत  " शिक्षक दिनाचे औचित्य साधून गौरव करण्यात आला. नांदेड येथे शिक्षकदिनी मुख्यमंत्री संवाद कार्यक्रमात, पुरस्कार प्राप्त, उपक्रमशील शिक्षकांचा गौरव करण्यात आला. 

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिक्षकदिनी सोमवारी दि. ५ सप्टेंबर रोजी नांदेड येथे दुपारी १ ते २ या वेळेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्स द्वारे  राज्यातील शिक्षक, अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यात शिक्षकांच्या समस्या, वेतन विषयक प्रश्न जाणून घेतले. आगामी काळात अग्रक्रमाने हे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध राहील याची ग्वाही दिली. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी शिक्षकांनी उपक्रमशिलता जोपासावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

या संवाद कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी नांदेड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर, माळोदे, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी माधव सलगर, बंडू आमदूरकर, यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार, राज्य पुरस्कार, व उपक्रमशील पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. उस्माननगर च्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व पुरस्कार प्राप्त शिक्षक जयवंत काळे यांचा यावेळी उपस्थित अधिकारी मंडळींनी गौरव केला. याबद्दल काळे यांचे सहकारी शिक्षक, पालक  व गावकरी मंडळींतून अभिनंदन केले जात आहे. 

----------------------------

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी