नांदेड| येत्या 2 ऑक्टोबर 2022 रोजी वंदे मातरम् अभियान प्रभात फेरीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ.हंसराज वैद्य यांनी केले आहे.
दि.2आक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधिजींच्या जयंतीचा दिवस. तसेच देशाचे लाडके दूरदृष्ट्ये पंतप्रधान मा. नरेंद्रजीभाई मोदीजींचा वाढदिवस. त्यातच स्वातंत्र्याच्या अमृतवर्ष महोत्सवांतर्गत जनाजनांत व मनामनांत राष्ट्रभक्ती जागृत व्हावी (मशाल पेटावी) म्हणून एकमेकांना भेटीच्या वेळी तथा फोनवर संभाषणाच्या सुरवातीस ’हॅलो’ ऐवजी वंदे मातरम म्हणान्याची सवय लागावी तथा सराव व्हावा या उद्देशाने वंदे मातरम अभियानाची सुरूवात प्रभात फेरीने करण्याचे ठरविले आहे.
आपण सर्व ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य संग्रामात असो की राष्ट्र उभारणीच्या कार्यासह कोणत्याही राष्ट्रीय कार्यात शत् प्रतिशत सहभागी असतोच. म्हणून या वंदे मातरम अभियानातही आपला संपूर्ण सहकार्य नोंदविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकानी या प्रभातफेरीत (रॅलित) सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ.हंसराज वैद्य यांनी केले आहे.