हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीची बैठक तहसीलदार डी.एन.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी सर्वानुमते नूतन संचालकपदी संजय माने, गजानन मुत्तलवाड, विलास वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांचे पुष्पहाराने स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.
मागील काळात मंदिर कमिटीच्या काही सदस्यांचा दुःखद निधन झालं, त्यामुळे मंदिरातील जागा रिक्त होत्या. त्या जागा भरण्याच्या दृष्टिकोनातून आज हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिराच्या कक्षात जुन्या संचालकांचाही बैठक तहसीलदार डी.एन.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत मागील वर्षभरात झालेल्या विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचा लेखा जोखा वाचून दखविण्यात आला. तसेच वर्षभराच्या खर्च, उत्पन्नाच्या नियोजन ऑडिटचे वाचन करण्यात आले. तसेच मंदिरात सुरक्षा गार्डची नेमणूक व मंदिरातील गाभाऱ्याच्या दुरुस्ती संदर्भात चर्चा झाली.
त्यानंतर मंदिर कमिटीच्या संचालक पदाच्या रिक्त जागेसाठी मान्यवरांनी नवे सुचविली. त्यात सर्वानुमते नूतन संचालकपदी संजय माने, गजानन मुत्तलवाड, विलास वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांचा पुष्पहाराने अभिनंदन करण्यात आले. एकूणच मंदिराच्या स्वच्छतेसह इतर व्यवस्था आणि कर्मचाऱ्याकडून कामे करून घेण्याच्या बाबतीत लक्षपूर्वक मंदिराची सेवा करावी अश्या सूचना महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी नूतन संचालकास केल्या. यावेळी जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे, प्रकाश शिंदे, जाधव गुरुजी, अनंतराव देवकते, मथुराबाई भोयर, लताताई मुलंगे, राजाराम झरेवाड, माधवराव पाळजकर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.