नांदेड। प्रशासनाच्या सूचनेप्रमाने गणेश मंडळानी रतनेश्वरी येथील झरी येथे गणेश विसर्जन केले. परंतु तिथे महानगर पालिकेच्या अधिकार्याने विसर्जणाची व्यवस्थित व्यवस्था केली नाही. गणेश मूर्ती नगर पालिकेच्या अधिकाऱ्याकडून त्या तलावात फेकण्यात आल्या व मोठ्या मूर्तीचे अवयव तोडून खंडीत करण्यात आले. ह्यामुळे श्री गणेशाचे विटम्बणा झाली व हिन्दू धर्मीय नागरिकांच्या भावना दुःखावल्या.
तसेच विसर्जनाच्या दिवशी जुना मोंढा ते मुथा चौक ह्या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद होते. आयुक्त साहेबाना ह्याची सूचना देऊन सुद्धा ते चालू करण्यात आले नाहीत. विसर्जनाच्या दिवशी काही भागात नळाला पाणी सुद्धा सोडण्यात आले नाही. तसेच रस्त्याच्या बाजूच्या झाडांची कटाई करण्यात आली नाही वयामुळे गणेश मूर्ती नेताना त्रास झाला व रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात सुद्धा आले नाहीत.
ह्या सर्व महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंधाधुद प्रकरणामुळे हिन्दू सनात जे अडथळे झाले आणि श्री ची विटंबना झाली आणि हिंदूंच्या भावना दुःखावल्या गेल्या. ह्या संबंधित अधिकार्यावर कडक कारवाही करावी अशी मागणी निवेदनामार्फत विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल व समस्त गणेश भक्ता तर्फे जिल्हाधिकारी साहेबाकडे करण्यात आली.