लोहा| मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सगळीकडे उत्साहात साजरा होत असतानाच लोहा शहराच्या जवळ असलेल्या धानोरा मक्ता या गावाच्या अंतर्गत येणाऱ्या गांधी नगर येथील ग्रामस्थ मात्र आपल्या उंबरठ्याला जाण्यासाठी दुरावस्थेतून "मुक्ती" व्हावी यासाठी पुरुष-महिला-लहान लेकरे नदी पात्रात हातात तिरंगा घेऊन राष्ट्रगीत गात होते. मागणी होती नदी वर पूल आणि तेथून गावात जायला रस्ता पण गेल्या चाळीस वर्षात हे काम झाले नाही. त्यामुळे येत्या गांधी जयंती दिनी गांधी नगर वासीय याच नदी पात्रात" प्रशासनाच्या कासव गती विरोधात ",जल आंदोलन करणार आहेत. सर्व ग्रामस्थ लेकरा बाळांसह या नदी पात्रात गुडघ्याभर पाण्यात दिवसभर बसणार आहेत.
धानोरा मक्ता अंतर्गत गांधी नगर वस्ती येथे तेथे जाण्यासाठी नदी पात्र ओलांडून जावे लागते. पावसाळ्या त्या नदीला भरपूर पाणी असते.पाऊस झाला की अलीकडचे अलिकडे आणि पल्याडचे पल्याड अशी स्थिती असते. शिवाय गावात जायला व्यवस्थिती रस्ता सुद्धा नाही. नदीवर पूलासाठी तात्काळ व रस्त्यासाठी निधी द्यावा यासाठी ग्रामस्थ लेकराबाळांसह मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी सकाळी नदी पात्रात उतरले. त्यांच्या हातात तिरंगा होता. भारत माता की जय.. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चिरायू होवॊ.. असा घोषणा देत होते..आम्हाला न्याय द्या.. पूल.. रस्ता द्या म्हणून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पण आंदोलन स्थळी कोणीच प्रशासनाचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता.
लोहा शहरा जवळ सहा किमी अंतरावर धानोरा मक्ता गाव आहे.गांधी नगर वासीय गेल्या अनेक वर्षा पासून आंदोलने करीत आहेत. अभियंता दाडगे यांनी या रस्त्याला नंबर मिळवून दिला. आपत्ती व्यवस्थापन मधून निधी मिळणार असेही सांगण्यात आले. पण कोणीच लक्ष देईना असे सुरेश नागरगोजे यांनी पोटतिडकीने सांगितले. लक्ष्मण नागरगोजे.बालाजी नागरगोजे, नामदेव भुजबळ, ज्ञानोबा नागरगोजे, आनंदा कोरे, बालाजी पिंपल्पले, व्यंकटी नागरगोजे, बळीराम नागरगोजे, दत्ता माटोरे, माणिका केंद्रे,भीमराव अकोले,बालाजी अकोले. पोलीस पाटील, जमादार बगाडे साहेब. राम कदम, नागेश नागरगोजे, लक्ष्मीकांत दहिफळे,रहीम शेख.शाळकरी मुले.ग्रामस्थ यांनी या आंदोलनात सहभाग झाले होते. गांधी जयंती दिनी गांधी नगर ग्रामस्थ नदी पात्रात दिवसभर बसून जल आंदोलन करणार आहेत असे सुरेश नागरगोजे यांनी सांगितले.
●खा.चिखलीकर यांची लक्ष्य द्यावे●
गांधी नगर वासीयांची होणारी दुरावस्था पूल व रस्त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा संघर्ष पाहता जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यात लक्ष घालावे. तात्काळ निधी मंजूर करून काम सुरू करावे जेणे करून ग्रामस्थांचा अनेक वर्षा पासूनचा प्रश्न कायम स्वरूपी मिटेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.