हळद उत्पादक शेतकरी - व्यापाऱ्यांच्या समस्या दूर करणार खासदार हेमंत पाटील -NNL

हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांची बैठक


नांदेड।
मराठवाड्यातील हळद एनसीडेक्सच्या जाचक निकषात बसत नाही, एनसीडीईएक्स शेतकऱ्यांची हळद खरेदी करत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर काही ठराविक लोक प्रत्यक्ष व्यापार न करता केवळ तेजी मंदी करून हळदीचे भाव पाडण्याचे काम करत आहेत. एनसीडेक्सच्या जाचक निकषातून व  वायदे बाजारातून हळदीला बाहेर काढून हळद उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा व त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी येथे सांगीतले.

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (ता.दोन) नांदेड येथील हाँटेल तुलसी येथे हिंगोली, नांदेड, वसमत, वाशीम, यवतमाळ व सांगली येथील हळद व्यापारी, शेतकरी उत्पादक, कंपन्या अडते यांची बैठक पार पडली यावेळी हिंगोलीचे माजी आमदार गजानन घुगे, बाबुराव पाटील कोहळीकर, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. व त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढला जाईल असे व्यापाऱ्यांना अश्वासन दिले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून सुरू करण्यात आलेल्या हळदिच्या वायदे बाजारात शेतकऱ्यांच्या नावाखाली काही ठराविक लोकच लाभ उठवत आहेत. प्रत्यक्ष खरेदी विक्री न करता केवळ सौदे करुन हळद बाजारात कृत्रिम तेजी मंदी करून हळदीचे भाव पाडण्याचे षडयंत्र गेल्या चार पाच वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला आहे. व वायदे बाजारातील शेतकऱ्याची होणारी पिळवणूक व लुट तात्काळ थांबवावी अन्यथा मराठवाड्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 

परंतू खासदार हेमंत पाटील यांनी मात्र कुठल्याही शेतकरी – व्यापारी आडते यांना आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. त्यापूर्वीच वायदेबाजारावर आपले नियंत्रण मिळाले पाहिजे यासाठी सेबीला बोलुन योग्य तो मार्ग काढणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी हळद उत्पादक शेतकरी – व्यापारी यांना अश्वासीत केले. व शेतकरी व्यापारी आडते यांना मोठा आर्थिक फटका बसणार नाही याची सर्वती खबरदारी घेतली जाईल असेही म्हटले आहे.

शिवाय एनसीडेक्सचे निकष अत्यंत जाचक असल्याने  मराठवाड्यातील व्यापार्यां्चा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा व  शेतकर्यांषचा माल पास होत नाही. देशातील हळदीच्या उत्पादनापैकी पन्नास टक्के उत्पादन एकच्या हिंगोली जिल्ह्यात होते. त्या पाठोपाठ मराठवाड्यातील नांदेड, परभणी, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात हळदीचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या सेन्सेक्सने आपले निकष बदलून विदर्भ मराठवाड्यातील हळद केंद्रस्थानी ठेवून निकष करावेत अशी मागणी करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होइल यासाठी प्रयत्न करणार असल्याते ते म्हणाले. 

या बैठकिला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव पाटील कोहळीकर, ज्ञानेश्वर मामडे,  हर्ष मालू , शेतकरी मित्र फार्मर प्रोडय़ुसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले,  गोदा फार्मचे नितीन चव्हाण, आनंद मंत्री, संदीप बाहेती, स्वप्नील मुरक्या , जुगल बाहेती, श्याम मुरक्या, मनोज लड्डा, सुनील लड्डा, जयप्रकाश लड्डा  ,गोपाल धुत ,प्रवीण कासलीवाल, प्रल्हाद काकांडीकर, बालाजी भायेगावकर,  अक्षय गोयंका, सत्तू भराडिया, अशोक पोवार, चेपुरवार आशिष, राका सुनील, काबरा संजय, बाहेती आलोक, जाधव आनंद, धुत, दीपक मुरक्या, रवी नागठाणे, राहुल नागठाणे यांच्यासह अनेकांची उपस्थित होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी