लोहा| सेवा पंधरवडा निमित्ताने भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर या जिल्ह्याच्या विविध भागात सेवा उपक्रमांच्या कार्यक्रमासा उपस्थित राहत आहेत.देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या विविध विकास कामांची माहिती त्या सांगत आहेत.लोकांना मार्गदर्शन करीत आहेत. या सेवा पंधरवाडा निमित्ताने त्यांनी पहिल्या टप्प्यात तालुक्यातील १५ अंगणवाडी बळकटीकरण करणार आहेत त्यानंतर दोन्ही तालुक्यातील सर्वच अंगणवाडी साठी हा प्रयोग राबविला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसा पासून ते अटलजी यांच्या जयंती पर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे.
सेवा पंधरवाडा निमित्ताने भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाउपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी ढाकणी (ता लोहा ) येथे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आ. सौ. उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा पासून ( सेवा पंढरवाडा ) ते 25 डिसेंबर स्व. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंती ( सुशासन) या काळात लोहा तालुक्यातील आदर्श अंगणवाडी करण्याची मोहीम प्राणिताताई यांनी हाती घेतली आहे. त्याच धर्तीवर लोहा -कंधार तालुक्यातील अंगणवाडी मध्ये हाच प्रयोग राबविण्यात येणार आहे. तसा संकल्प त्यांनी केला आणि त्यादृष्टीने त्यांनी प्रत्यक्ष कामाला आरंभ केला आहे.
पंधरा अंगणवाडी दत्तक घेतल्या त्यापैकी ढाकणी ( ता.लोहा) येथील 2 अंगणवाड्यांना भेट दिली विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना खाऊ वाटप करण्यात आला. .पुढील भेटी दरम्यान स्वच्छता,वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या भेटीदरम्यान अंगणवाड्यातील विविध समस्याचे निराकरण करावे असा सूचना त्यांनी संबंधितांना केल्या. लोहा भाजपा तालुकाध्यक्ष आनंद पाटील . ढाकणीकर, सरपंच उत्तमराव गजभारे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष चंपती पा. शिंदे, चेअरमन माधवराव शिंदे,डॉ.अली सर,डॉ. मारावार,काळबा पाटील,साधू महाराज, माधव पाटील, राम चिलपिपरे, बाबू महाराज,प्रभू आढाव, सुरेश गजभारे, एकनाथ पाटील, प्रभू महाराज यांच्या सह अंगणवाडी शिक्षिका,मदतनीस उपस्थित होत्या.