सुखकर्ता...दुखहर्त्या बाप्पाला भावपूर्ण निरोप.... पुष्पवृष्टी, टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये निघाली श्री विसर्जन मिरवणूक -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार| गणपती स्थापनेच्या १० व्या दिवशी अनंत चर्तुदशी दि.०९ रोजी शुक्रवारी आल्याने दुपारी २ वाजता गाजत निघालेली श्री गणपती बाप्पाची मिरवणूक रात्री ०१ वाजेपर्यंत सुरूच होती. येथील इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिराजवळील श्री कनकेश्वर तलावाच्या विहिरीत दुपारी परमेश्वर मंदिरातील पालखी गणपतीसह शहरातील अनेक गणपतीचे विसर्जन तूच सुखकर्ता... तूच दुखहर्ता... अवघ्या दिनाच्या नाता... बाप्पा मोरया रे... गणपती अपने गांव चाले... कैसे हमको चैन पडे... निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी.... चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी... अश्या धार्मिक गीतांच्या उत्साहपूर्ण वातावरणात करून बाप्पाला जाड अंतकरणाने भावपूर्ण निरोप दिला.



शुक्रवारी दहाव्या दिवशी जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणेशाची पालखी मिरवणूक टाळ - मृदंगाच्या गजरात व ढोल - ताश्याच्या वाद्यात सकाळी १० वाजता काढण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यावरून श्री कनकेश्वर तलावात गणरायाचे विसर्जन करण्यात आहे. त्यानंतर शहरातील प्रथम क्रमांकाच्या व्यापारी गणेश मंडळापाठोपाठ सर्वच गणेश मंडळाच्या युवकांनी भजनी मंडळींच्या दिंडीसह पुष्पवृष्टी करत भव्य मिरवणूक काढली होती. बाप्पाची मिरवणूक दुपारी ०२ वाजता दिंड्यांसह भारूड भजनाच्या तालामध्ये निघाली. या मिरवणुकीमध्ये आ.माधवराव पाटील जवळगावकर सामील झाले आणि त्यांनी टाळ हाती घेऊन गणरायाला निरोप दिला. शहरातील प्रसिद्ध मनाच्या वडाच्या मंडळाच्या ठिकाणी गणेश भक्त संतोष वानखेडे व बालाजी उत्तलवाड या युवकांनी खिचडीच्या प्रसादाचे वितरण केले. 


अनंत चतुर्थी निमित्त सर्वात प्रथम येथील वरद विनायक मंदिरातील गणेशाचे विसर्जन, त्यानंतर श्री परमेश्वर मंदिरातील पालखी गणेशाचे आणि त्यानंतर लहान बालकांच्या बाप्पाचे विसर्जन आनंदाने करण्यात आले. मुख्य मिरवणूक सायंकाळी ४ वाजता निघाली यावेळी गणरायाला निरोप देऊन शेवटचे दर्शन घेण्यासाठी हजारो महिला, पुरुष व बालभक्त रस्त्याच्या कडेला उपस्थित झाले होते. कारण गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे गणपती बाप्पाचा उत्सव पाहता आला नव्हता. यंदा मात्र शासनाने सर्व निर्बंध हटविल्याने धुधडाक्यात गणपती बापपची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे गणपती राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर दुतर्फा प्रचंड गर्दी होती. इमारतींच्या खिडक्या, छतावर दाटीवाटीने उभे राहून भक्तांनी बाप्पाचे अखेरचे दर्शन घेतले. परंपरेनुसार निवडक ठिकाणच्या भक्तांनी बाप्पावर पुष्पवृष्टीही केली. 


दरम्यान नगरपंचायतीने शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवून मिरवणुकीतील अडथळा दूर केला, तसेच सतर्कता म्हणून अग्निशमन बंब, ऐम्बुलन्स, जीव रक्षक पथक व क्रेन तैनात करण्यात आली होती. आणि ठिकठिकाणी विजेचे खांब लावून अंधार दूर केला तसेच भक्तांसाठी प्रसादाची सोय केल्याचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले. मात्र पाऊस झाल्यामुळे पुन्हा खड्ड्याची अवस्था जैसे थे झाली असल्याचे पाहावयास मिळाले. 


ठिकठिकाणी मंडळाचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आणि महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले. एकूणच यंदाचा गणेशोत्सव हिंदू -मुस्लिम भाईचारा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत साजरा करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने मिरवणूकित कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. श्री विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी सर्वच मंडळाचे युवक, व्यापारी, पत्रकार, पोलीस व सर्व हिंदू -मुस्लिम बांधवानी सहकार्य केले. 


दरम्यान विसर्जन स्थळाच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार डी.एन गायकवाड, नायब तहसीलदार अनिल तामसकर, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद, मुख्याधिकारी जाधव, रमाकांत बाचे, पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, नंदलाल चौधरी, स्मिता जाधव मैडम आदींसह अनेक अधिकारी कर्मचारी व पत्रकारांनी भेट देऊन पाहणी केली. आणि विसर्जन शांततेत करण्याचे आवाहन गणेश मंडळांना केले होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी केली गणपतीची आरती 


हिमायतनगर येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, पोलीस उपाधिक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी येथील बजरंग गणेश मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. आणि मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादाचा स्वादही घेतला.



Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी