सामाजिक एकोपा व शांततेत गणेशोत्सव साजरा व्हावा - पोलीस अधीक्षक शेवाळे -NNL


लोहा|
सामाजिक सलोखा कायम ठेवून गणेशोत्सव पोळा हे सण उत्सव साजरे करावेत. कायद्याचे पालन करावे तसेच सामाजिक प्रबोधन व एकोपा आणि एकात्मता रहावी यासारखे  कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले. 

लोहा पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी पोलीस अधीक्षक श्री शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे  डीवायएसपी मारोती थोरात, पोलीस निरीक्षक संतोष तांबे, बीडीओ शैलेश वाव्हूळे, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, गणेश महासंघाचे केशवराव मुकदम मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, उपअभियंता मोहन पाटील पवार, महावितरणचे अभियंता इजि शिवाजी वाघमारे, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, गटनेते करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, माजी, उपसभापती नरेंद्र गायकवाड, 

नगरसेवक भास्कर पवार, आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेल्लवार नगरसेवक नबीसाब, संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, पत्रकार ज्ञानोबा पाटील पवार, खविसं उपसभापती शाम पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे, मनोहर पाटील भोसीकर, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळ अध्यक्ष सरपंच ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी, गणेश मंडळांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन केले पाहिजे अंगलट असे कुणी काही करू नये  तसेच पर्यावरण पुरक गणेश  उत्सव साजरा करणार आहेत.

त्यांचा आमच्या वतीने सत्कार करण्यात येईल तसेच जे गणेश मंडळ  उत्कृष्ट देखावा सादर करतील त्यांना बक्षीस देण्यात येईल असे मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक,डीवाय मारोती थोरात , तहसीलदार व्यंकटेश मुंढे, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, विलास सावळे, नगरसेवक भास्करराव पाटील पवार यांची भाषणे झाली. आभार पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांचाळ यांनी केले सपोनि शेख, पोउनि मारुती  सोनकांबळे , डीएसबीचे गिरे शेंबाळे, व पोलीस कर्मचारी यांनी  परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी