लोहा| आपल्या देशाकडे आजच्या घडीला युवकांचा देश म्हणून पाहिले जात आहे. अशा स्थितीमध्ये संख्येनेअधिक असलेल्या युवकांमध्ये कायदेविषयक जनजागृती होणे, त्यांना भारतीय संविधानाची ओळख करून देणे ही काळाची गरज झाली आहे. असे प्रतिपादन तालुका विधी सेवा समिती कंधारच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्या. माधुरी आनंद यांनी केले.
लोह्याच्या श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व एन सी सी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त कायदेविषयक घेण्यात आले. शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्या माधुरी आनंद होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ.एस व्ही मंडगे, कंधार वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बी टी राठोड, उपाध्यक्ष ॲड.बी व्ही पाटील, ॲड. दिलीप कुरुडे, कंधार न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक बी.बी.मुधोळकर कनिष्ठ लिपिक राम सोनकांबळे राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा.अमृत जाधव, एनसीसी विभागप्रमुख प्रा.डॉ. बी आर ठाकूर हे उपस्थित होते.
न्या आनंद यांनी कायदे विषयक जागृती होणे तसेच सविधान अभ्यास असणे गरजेचे आहे.असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ॲड.कुरुडे यांनी म्हटले की, युवकच देशाचे भविष्य घडवणारे आहेत म्हणून त्यांना संविधानात्मक मूल्य समजली पाहिजेत. ज्यामुळे त्यांच्याकडून विधायक कार्य होईल. असे सांगितले अध्यक्षीय समारोपात प्रोफेसर डॉ. एस व्ही मंडगे यांनी, आजच्या कायदेविषयक शिबिरातून महाविद्यालयीन विद्यार्थी निश्चितच चांगला बोध घेतील.
कायद्याचे पालन करतील असे नमूद केले. प्रा.अमृत जाधव यांनी प्रास्ताविकात जागतिक युवा दिनाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.जयराम सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉ. बी आर ठाकूर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक व प्राध्यापकेत्तरकर्मचारी उपस्थित होते.
