हिमायतनगर येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी -NNL

शहरातील जयंती मंडळाकडून भव्य रॅलीचे आयोजन... 

हिमायतनगर। हिमायतनगर शहरात दिनांक २१ आॅगष्ट २०२२  रविवार रोजी सकाळी १० वाजता साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला आहे. 

स्वातंत्र चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व आपल्या साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी नेहमी झगडणारे  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सर्व प्रथम प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण केले आहे. त्यानंतर  हिमायतनगर येथील पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला  त्यानंतर साठे नगर येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली.


हि मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून जात असताना विविध ठिकाणी साहीत्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. या मिरवणूकीचे विसर्जन साठे नगर येथे करण्यात आली आहे. यावेळी हिमायतनगर येथील पोलिस निरीक्षक बि. डी. भुसनर साहेब, बालाजी महाजन साहेब, शिगंनवाड साहेब, राठोड साहेब, लहुजी शक्ति सेना नांदेड जिल्हा युवा उपाध्यक्ष मा.संतोष हातवेगळे, मांतग समाजाची बुलंद तोफ मा.संतोष भाऊ बनसोडे,  संतोष आंबेकर, गंगाधर गायकवाड दिघीकर ( पत्रकार ) लहुजी शक्ति सेना हिमायतनगर तालुका अध्यक्ष राजु गायकवाड,संदिप गुंडेकर,गजानन वाघमारे, विकास मनपुरे, जयंती मंडळाचे अध्यक्ष सुरेश  बनसोडे, प्रदिप तपासकर, ओमकार वाघमारे, गुंडेकर साहेब सवनेकर, दशंरथ आंबेकर पत्रकार,चितंलवाड वारंग टाकळी,हरी तपासकर सह हिमायतनगर तालुक्यातील व शहरातील सामाजिक कार्यकर्ते व मातंग समाजातील महिला व पुरुष मंडळी आणि नवयुक मंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी