रस्त्याचे कामे जलद गतीने व दर्जेदार व्हावे यासाठी आजी-माजी आमदारांनी घेतला होता पुढाकार
किनवट, माधव सूर्यवंशी। तालुक्यातुन व शहरातुन जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग १६१ (ए) चे भिजत घोंगडे आजी – माजी आमदारांनी पुढाकार घेतल्या नंतर देखिल जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या दालणात प्रलंबित असल्याने दिनांक २० जुन रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या दालणात झाल्या नंतर इको सेन्सेटिव झोन व किनवट शहरातील जिजामाता चौक ते अशोक स्थंभ या मार्गाच्या रुंदीचा प्रश्न प्रलंबित राहिलेला होता कारण उर्वरीत मार्ग म्हणजे अशोक स्थंभ ते कोठारी व जिजामाता चौक ते डॉ बाबासाहेब चौक येथिल मार्ग हा ३० मिटर रुंद होईल अशी ग्वाही राष्ट्रीय महामार्गच्या अभियंत्यांनी दिली होती.
सुमारे ६ वर्षापासुन ज्या मार्गाचे काम चालु आहे व लवकरच या मार्गाची नोंद प्रदिर्घ कालावधी करिता प्रलंबित मार्ग म्हणुन नोंद घेतली जाणार असलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ (ए) हे सर्व ठीकाणी किमाण ३० मिटर रुंद व्हावे, ग्रामिण भागात या मार्गावरील सर्व्हीस रोड निर्माण करण्यात यावे व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपाययोजना या ठीकाणी उपलब्ध करुन दिल्या जाव्यात या करिता माजी आमदार प्रदीप नाईक यांनी पुढाकार घेऊन या राष्ट्रीय महामार्गा करिता राण उभे केले होते. ज्याला आमदार भिमराव केराम यांची देखिल साथ लाभली होती कारण लोकांच्या निकडीचा प्रश्न असल्याने यामध्ये कसलेही राजकारण आडवे न आणता दोन्ही लोकप्रतिनिधींनी सामंजस्य दाखवले होते.
या मार्गाकरिता माजी आमदार प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हाधिकारी नांदेड, वन संरक्षक पुसद तथा राज्यातील विविध मंत्री व प्रशासकीय विभागांशी पत्रव्यवहार केला होता. ज्यामध्ये दोन वेळा बैठका आयोजित करण्यात आल्या ज्यामध्ये एका बैठकीत जिल्हाधिकारी नांदेड तर एका बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांची प्रमुख उपस्थिती होती. तर माजी आमदार प्रदीप नाईक व आमदार भिमराव केराम यांचे शिष्टमंडळ देखिल यामध्ये सहभागी झाले होते. तर विविध शासकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांची देखिल यामध्ये उपस्थिती होती.
वर्ष २०२२ या वर्षाच्या मे, जुन, जुलै महिण्यामध्ये या मार्गाकरिता उभय नेत्यांनी धडपड केली होती कारण पावसाळ्यामध्ये मार्ग बंद होऊन नागरीकांना त्रास होऊ नये परंतु झाले ते तालुक्यात अतिवृष्टीमुळे हा मार्ग दोन महिण्यात अनेक तास बंद होता. त्यामुळे किनवट माहुर तालुक्यातील नागरीकांना या मार्गामुळे अतोनात त्रास झालेला आहे.
तरी सदर मार्ग लवकरात लवकर व्हावा किमान ३० मिटर एवढा रुंद व्हावा हि किनवट तालुक्यातील नागरीकांची तिव्र इच्छा असुन या मार्गामुळे ज्यांची ज्यांची मालमत्ता बाधित होत आहे त्यांना शासनाने नुकसान भरपाई देखिल द्यावी कारण कोणाचे नुकसान होऊन मार्ग झालेला कोणालाही आवडणार नाही परंतु या संदर्भातील कागदपत्रे संबधितांना सादर करावी लागेल. तत्पुर्वी या मार्गावरील मालमत्ताधारकांनी ६०० पानांची याचीका औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त होत आहे.
दिनांक २० जुन रोजी इको सेन्सेटीव्ह झोन संदर्भातील जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या दालणातील सुनावणी हि आपल्या विरोधात जाऊ शकते या करिता मालमत्ताधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन बचावात्मक पवित्रा घेतला आहे. आता जिल्हाधिकारी यवतमाळ , उच्च न्यायालय, किनवट येथिल मालमत्ताधारक यांच्या कचाट्यात अडकलेल्या या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ (ए) चे भिजत धोंगडे कधी सुरळीत होईल व या मार्गावरुन प्रवास करणा-या नागरीकाचा त्रास कधी संपेल या याकडे त्रस्त जनतेचे डोळे लागले आहे.