औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने सोमवारी भरती मेळाव्याचे आयोजन -NNL


नांदेड|
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने  आयटीआय शिकाऊ उमेदवारासाठी सोमवार 10 ऑक्टोंबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी या भरती मेळाव्यास सोमवारी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार पि.के.अन्नपुर्णे यांनी केले आहे.

या मेळाव्यात पुढील व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. फिटर, एसएमडब्लू, एमआरएसी, मेकॅनिस्ट, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, कोपा, टीडीएम, ड्राफ्टसमॅन मेकॅनिकल, आयसीटीएसएम, वायरमन, पेन्टर सामान्य, इलेक्ट्रीशियन मेकॅनिकल इ. आवश्यक ट्रेडसाठी आयटीआय उत्तीर्ण व परीक्षा दिलेले परंतु निकाल प्रलंबित असलेले उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी