नांदेड| मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्थागुशा ,नांदेड यांनी वेळोवेळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु होते. यादम्यान दिनांक १८/०८/२०२२ रोजी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पथके हे नांदेड शहरात पेट्रोलींग करीत असताना, गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की, पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्यीत, टापरे चौकजवळ, नांदेड येथे रोडलगत झुडपाचे बाजुस काही इसम थांबलेले असुन, त्यांचेकडे खंजर , तलवार व इतर हत्यारे आहेत. ते कुठेतरी दरोडा टाकण्यासाठी तयारीत आहेत.
अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने स्थागुशचे पथकाने सदर ठिकाणी वेळ रात्री १०.४५ वाजताचे सुमारास लातुर ते नागपुर जाणारे बायपास रोडवरील टापरे चौकजवळ, नांदेड येथे रोडलगत झुडपाचे बाजुस गेले असता, काही इसम संशयास्पदरित्या दबा धरुन बसलेले दिसुन आले. पोलीसांनी सापळा रचला असता , पोलीसांना पाहुन दबा धरलेल्या इसमापैकी चार इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. पोलीसांनी नामे 1) राजेंद्र ऊर्फ दादा छगन काळे वय ४८ वर्ष व्यवसाय मजुरी रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद 2) संजय ऊर्फ पिल्या ऊर्फ भैया पि. राजेंद्र ऊर्फ दादा काळे वय २५ वर्षे व्यवसाय मजुरी रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद 3) नितीन भारत डिकले वय २८ वर्षे व्यवसाय मजुरी रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद 4) प्रदिप बाळासो चौधरी वय २७ वर्षे व्यवसाय बेकार रा. उरळीकांचण , ता. हवेली जि. पुणे या चार इसमांना अत्यंत शिताफीने आवश्यक त्या बळाचा वापर करुन आरोपी अटक केली.
यांना पकडुन त्यांचे सोबतचे पळुन गेलेल्या इसमांचे नावे विचारता त्यांनी त्यांचे नावे 5) रविंद्र बप्पा काळे रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद 6) शंकर सुरेश काळे रा.- मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद 7) अनिल रमेश शिंदे रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद 8) अरुण बबन शिंदे रा. मोहा ता. कळंब जि. उस्मानाबाद असे असल्याचे सांगीतले. नमुद आरोपीताकडे खंजर , तलवार , हातोडी , सबल, टॉमी , लोखंडी रॉड , दोर , मिरची पुड, मोबाईल हँडसेट व दोन चार चाकी वाहने असे एकुण १३ लक्ष ३३ हजार ७००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी हे लातुर ते नागपुर जाणारे बायपास रोडवरुन जाणाऱ्या - येणाऱ्या लोकांना , वाहनांना आडवुन वाहनातील लोकांजवळील पैसे, मोबाईल काढुन घेवुन लुटमार करण्याचे इरादयाने थांबलेले आहे असे सांगीतलेने त्यांचे विरुध्द पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. ५२०/२०२२ कलम ३९९,४०२,भा. द. वि. सहकलम ४/२५ भा. ह. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांना इतर गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. ५१७/२०२२ कलम ४५७,३८०,५११ भा. दं. वि. हा गुन्हा केला असल्याचे सांगीतले आहे. नमुद आरोपीतांकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगीरी मा. प्रमोद शेवाळे,पोलीस अधीक्षक ,नांदेड , मा.निलेश मोरे,अपर पोलीस अधीक्षक ,नांदेड , मा. विजय कबाडे,अपर पोलीस अधीक्षक ,भीकर व श्री द्वारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा येथील सपोनि श्री पांडुरंग माने, घेवारे, पोउपनि/ डिएन.काळे, पोहेकॉ/ सुरेश घुगे , मारोती तेलंग, पोना / बालाजी तेलंग , विठल शेळके , पोकॉ/ तानाजी येळगे, मोतीराम पवार, बालाजी यादगीरवाड, चालक हेमंत बिचकेवार , शेख कलीम यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे नांदेड यांनी कौतुक केले आहे.