शेतकऱ्यांना मावेजा मिळवून दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही - व्यंकटराव पा. गोजेगावकर -NNL

बिदर राष्ट्रीय महामार्गाच्या मावेजासाठी व्यंकटराव पा. गोजेगावकर आक्रमक


मुखेड, रणजित जामखेडकर।
नांदेड - बिदर राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची बैठक भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दि .६ ऑगस्ट रोजी मुक्रमाबादच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात झाली . न्यायालयाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने आला असून त्यानुसार मावेजा मिळावा म्हणून शेतकरी आक्रमक झाले आहेत . भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर म्हणाले की , नांदेड - बिदर राष्ट्रीय महामार्गात जमीनी गेलेल्या शेतकऱ्यांना मावेजा मिळवून दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही . यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी लवकरच निवडक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे .

 त्यांच्याकडे या राष्ट्रीय महामार्गा संबंधी विविध मागण्या सादर करण्यात येणार आहेत . वेळ प्रसंगी जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहे शिवाय ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या पण त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली नाही अशा शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही . त्यांचेही कागदपत्रे जोडून न्यायालयात त्यांनाही न्याय मिळवून देण्यात येणार आहे . नांदेड- बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ( अ ) मध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी

गेल्या त्यांना त्याचा मोबदला मिळाला नसल्याने तुंबरपल्ली , वंडगीर , लखमापुर , डोरनाळी येथील शेतकऱ्यांनी शेतीच्या मावेजासाठी औरंगाबाद ऊच्च न्यालयाच्या मुंबई खंडपीठाच्या न्यायदानात रिट याचीका क्रमांक २०१ ९ चा ११६२ ९ सह रिट याचीका क्रमांक २०१ ९ चा ११६८८ सह रिट याचीका क्रमांक २०१ ९ चा ११६४२ सह रिट याचीका क्रमांक २०२० चा २ ९ ३३ नुसार रामराव पांडुरंग पाटील आणी ईतर यांनी न्यायालयात धाव घेतली होती . अँड . लक्ष्मीकांत सी . पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजु न्यालयात मांडली . न्यायालयाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला असल्याने शेतकऱ्यांना मदत करणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीचे आयोजन बालाजी पाटील लखमापुरकर यांनी केले होते .

 यावेळी सुभाषअप्पा बोधने , ऊत्तम पंदिलवार , सुरेश पंदिलवार , तम्मा अप्पा गंदीगुडे , वामनराव पाटील , सरपंच प्रतिनिधी बालाजी बोधने , उपसरपंच सदाशिव बोयवार , ग्रा.पं. सदस्य शंकरअप्पा खंकरे , बालाजी पसरगे , राजेश्वर पाटील , बालाजी पाटील , अशोक पाटील , चॉदसाब खुरेशी , नारायण पाटील हंगरगा , राम पाटील तुंबरपल्ली , ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

नांदेड - बिदर महामार्गासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी भेट घेऊन शेतकऱ्यांना अधिकाधिक मावेजा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेतकरी कृती समितीच्या आयोजित बैठकीत व्यंकटराव पा. गोजेगावकर सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी