भोकर| येथील वात्सल्य ईण्डेन ग्रामीण वितरक भोकर येथे आज येथील तहसीलदार राजेश लांडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली असून, हि वृक्ष जागविण्याचा संकल्प येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे.
आज क्रांती दिन व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भोकर येथील वात्सल्य ईण्डेन ग्रामीण वितरक गोडाऊन परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. यामध्ये वड, पिंपळ, करंज, सीताफळ, कांचन, आपटा, आदींसह विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. यावेळी तहसीलदार राजेश लांडगे यांनी प्रधानमंत्री उज्वला गैस योजने संबंधी मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरण पूरक एलपीजी गैस चा वापर करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. यावेळी गटविकास अधिकारी अमित राठोड, नायब तहसीलदार संजय सोलनकर, मंडळ अधिकारी एस एस कुसळे, तलाठी मिलिंद टोणपे आदींसह येथील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मंडळ अधिकारी श्रीमती एस एस कुसळे यांनी सांगितले कि, महिलांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी स्वच्छ इंधन वापरावर भर द्यावा याबद्दल मार्गदर्शन केले.