मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यातील वयोवृद्ध निराधारांच्या अनुदान वाटप करण्यासाठी दरवेळी दिरंगाई होत असुन या विभागात दलालाचा सुळसुळाट झाला आहे. निराधारांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने निराधारांची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे.
निराधारांची आडवणुक करणार्या संबंधित विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्याची तात्काळ बदली करून तालुक्यातील निराधारांना न्याय द्यावे या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी सौम्या शर्मा व तहसीलदार काशीनाथ पाटील यांना देण्यात आले आहे.
प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेडच्या वत्तीने दि.१८ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष प्रदीप पा.हसनाळकर,संभाजी ब्रिगेड सचिव सदाशिव पा.सुगावे, शिवव्याख्याते बजरंग पा.पाळेकर यांच्या सह तालुक्यातील वयोवृद्ध निराधार लाभार्थ्यासह संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते उपस्थित मोठ्या होते.