उपचारा दरम्यान तुरुणाचा मृत्यू झाला; वाका.येथील घटना
उस्माननगर, माणिक भिसे| लोहा तालुक्यातील वाका येथे किराणा दुकानासमोर बसुन दारु पिण्याच्या कारणावरुन अरोपींनी एका व्यक्तीस मारहाण केल्यामुळे त्या व्यक्तीला हा अपमान सहन न झाल्यामुळे त्याने विषारी औषध प्राशन केल्याने दि.२८ रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना वाका येथे घडली आहे. गोपिराज भोजराज हंबर्डे (वय २२) वर्षे असे मयताचे नाव आहे. मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन दोन अरोपी विरुध्द उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाका येथील मयत गोपिराज भोजु हंबर्डे (वय २२) याची पत्नी शिलाबाई हंबर्डे यांनी अरोपी तिरुपती दत्ता हंबर्डे (३०) व गणेश दत्ता हंबर्डे (वय२५) याच्या विरोधात दिली फिर्याद दिली असुन, फिर्यादीत म्हटले आहे की तिचा पती गोपीराज हंबर्डे याला दि.२४ रोजी उपरोक्त अरोपी हे त्याच्या दुकानासमोर मारहाण करत असाल्याची माहीती मिळाली. तेव्हा ते भांडण सोडविण्यासाठी त्या गेल्या असता सदरील दोन अरोपीनी त्यांच्या पतीसह त्यांना देखील लाथा बुक्यानी मारहाण केली. या भांडणादरम्यान तुम्ही माझ्या नवऱ्याला कशासाठी मारहाण करता असे तिने विचारले असता अरोपीनी सांगितले की, तो आमच्या दुकानासमोर बसुन दारु पिऊ लागला त्यामुळे त्याला उठून जाण्यास सांगितले असता त्याने वाद घातल्याने आम्ही त्यास मारहाण केल्याचे सांगितले.
त्यांनी केलेल्या मारहानीचा अपमान त्यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी घरी येऊन विषारी औषध प्राशन केले व तक्रार करण्यासाठी उस्माननगर येथे गेलो असल्याचे सांगितले. तेथील पोलिसांनी त्यांना येथील स्थानिक दवाखान्यात दाखल केले असता डाँक्टरांनी त्यांना नांदेड येथील दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे विष्णुपुरी येथील दवाखान्यात त्यांची तब्येत आणखीनच खराब झाल्याने दि २८ रोजी सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला असल्याचे सांगितले.
त्यामुळे त्यांच्या मृत्युस जबाबदार असलेल्या १)गणेश दत्ता हंबर्डे २)तिरुपती दत्ता हंबर्डे दोघेही रा.वाका ता.लोहा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असुन मयत गोपीराज भोजराज हंबर्डे यांच्या पार्थिवावार वाका येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी व एक बहीण आहे.