महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून ‘स्त्रीकोश’ चा सन्मान डॉ. तौर यांना भालेराव स्मृती पारितोषिक -NNL


नांदेड|
महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था म्हणून परिचित असणाऱ्या पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेने आपल्या साहित्य पुरस्कारांची घोषणा केली असून, २०२१ मधील सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृतीस देण्यात येणारे शरदचंद्र मनोहर भालेराव पारितोषिक ‘स्त्रीकोश: भारतीय स्त्री कविता’ या ग्रंथास जाहीर झाले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर आणि अकोला येथील तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. स्वाती दामोदरे यांनी एकत्रितपणे ‘स्त्रीकोश : भारतीय स्त्री कविता’ या बृहत् ग्रंथाचा अनुवाद केला आहे.  

मराठी भाषा, साहित्य, समीक्षा व संस्कृती यांच्या जतन व संवर्धनासाठी मागील ११६ वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था कार्यरत आहे. अनेक थोर लेखकांनी वाङ्मयसेवकाची भूमिका पार पाडत या संस्थेला नवा रूपाला आणले आहे. मसापने २०२१ या वर्षातील विविध साहित्य प्रकारातील साहित्यकृतींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची आज घोषणा केली.  

सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती म्हणून ‘स्त्रीकोश: भारतीय स्त्री कविता’ या ग्रंथाचा दि. १२ सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध हिंदी लेखिका सूर्यबाला यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान केला जाणार आहे. असे परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनिताराजे पवार, उद्धव कानडे यांनी कळवले आहे. डॉ. पृथ्वीराज तौर मागील एकोणीस वर्षांपासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एकूण २४ पुस्तके प्रकाशित असून, ते शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्यही आहेत.  

मसापच्या भालेराव पारितोषिकाच्या निमित्ताने डॉ. पृथ्वीराज तौर यांचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलचिव डॉ. सर्जेराव शिंदे, भाषा संकुलाच्या संचालीका डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे  समन्वयक डॉ. पी विठ्ठल, अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील, अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, डॉ. महेश जोशी, डॉ. सचिन नरंगले, डॉ. राजाराम माने यांनी अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी