उस्माननगर, माणिक भिसे| आलेगाव ता.जि.नादेड येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुश शिंदे पाटील आलेगावकर यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नांदेड जिल्हा उत्तर चिटणीसपदी निवड करण्यात आल्याचे कैलास कदम तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नांदेड उत्तर यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन जाहीर करण्यात आले आहे.
अंकुश शिंदे पाटील आलेगावकर हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचा प्रत्येक सहभाग होत असतात.अंकुश शिंदे पाटील हे मागील अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. महापुरुषांची जयंती व अन्य कार्यक्रमानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवतात तर सामाजिक समस्या सोडविण्यासाठी ते पुढाकार घेतात.
त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी , राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाउपाध्यक्ष अंबादास जोगदंड, संदीप क्षिरसागर ,प्रा.शिवराज पवार , जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब सोनकांबळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नांदेड उत्तर तालुकाध्यक्ष कैलास कदम, दक्षिण तालुकाध्यक्ष पांडुरंग क्षिरसागर, नांदेड उत्तर तालुका उपाध्यक्ष गणेश आरसुळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. अंकुश शिंदे पाटील आलेगावकर यांची निवड झाल्याबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.
