नांदेड| प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय,वसंत नगर नांदेड व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि ग्लोबल रिसर्च सेंटर माउंट आबू यांच्या संयुक्त विद्यमाने ' तणावमुक्त जीवनशैली' या कार्यशाळेचे आयोजन दिनांक ०२ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ०५.३० वाजता स्टेडियम परिसरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे करण्यात आले आहे.
तणावमुक्त जीवनशैली या कार्यशाळेत सकारात्मक चिंतन,जीवनात मूल्यांचा विकास,आणि जोपासना, वसंबंधांमध्ये माधुर्य, इत्यादी विषयावर मुख्य वक्ते बी.के. कल्पना बहेनजी, आणि बी.के. श्रीनिधी भाईजी हे खास माउंट आबू राजस्थान येथून मार्गदर्शनासाठी येणार आहेत. बी.के. कल्पना बहेनजी जेष्ठ राजयोग शिक्षिका विहासा प्रशिक्षक आणि मनोविशेषज्ञ् आहेत. तसेच ग्लोबल हॉस्पिटल रिसर्च सेंटर माउंट आबू या ठिकाणी समुपदेशक या पदावर सेवा देत असून बी.के.श्रीनिधी भाईजी विहासा प्रशिक्षक मेनेजमेंट ट्रेनर आहेत. तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्र विश्व संमेलन सहित अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर ब्रह्म कुमारी संस्थेचे प्रतिनिधित्व केले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, महापौर जयश्री निलेश पावडे, मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, उपस्थित राहणार आहेत. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय,वसंत नगर नांदेड, नांदेड वाघाला शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे यशस्वी नियोजन बी.के. स्वाती बहेनजी,यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मकुमारी परिवार वसंत नगर नांदेड करीत आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.