हदगाव, शे चांदपाशा| जोश आणि होश मध्ये काही जणाना उत्साह येतो. यामुळे कुणाच्या भावना दुखणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. असे अहवान नादेड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी गुरुवारी शहरातील संतरोहीदास सभागृहात गणेश उत्सव पोळा व नवराञच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या शांताता बैठकीत केलं.
यावेळी त्यांनी मंडळाच्या पदधिका-याना व नागरिकांना उद्देशून बोलतांना सागितले की, जेव्हा जोश मध्ये कळत न कळत काही घटना घडतात. परंतु काही काळा नंतर आपणास त्या घटनेचा पश्चात्ताप होतो तोपर्यत वेळ गेलेली असते. आपण जेव्हा जोश मध्ये असतो तेव्हा गुन्हे दाखल होतात. तेव्हा माञ पुढील स्पर्धक परिक्षा नौकरी या करिता हे गुन्हे अडसर ठरतात. या करिता विवाद टाळले पाहीजे जगात काय चाललय हे आता एका क्लिक वर माहीती मिळते. वादग्रस्त स्टेटस फेसबुकवर सामाजिक वातावरण दुषित न करता आपल्याला आपल्या गावात शहरात कसे सामाजिक उपक्रम राबविता येईल याकडे लक्ष दयावे. आता पर्यत नादेड जिल्ह्यात १०० पेक्षाजास्त वादग्रस्त फेसबूक आकाऊट प्रशासनाने करुन संबंधितवर कायदेशीर कारवाई पण करण्यात आल्याची माहीती त्यांनी दिली.
डिजेवर बंदीच /अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे
हदगाव तालुक्यातील मटका गुटखा दारु हे पुर्णपणे बंद व्हायलाच पाहीजे. या बाबतीत त्यांनी स्थानिक पोलिस प्रशासनाला शांताता बैठकीतच सक्त सुचना भोकर पोलिस विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे यानी दिल्या. तसेच डिजेला तर बंदी आहेच या गणेश उत्सवनिमितान समाजाला चांगला संदेश यावेळी देवू या. तसेच डिजे मुक्त श्री गणेश कायम प्रेरणा देणारा देवता आहे. पर्यावरणपुरक मुर्तीची स्थापना ह्वावी अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर, कृ. उ .बा. सभापती शामराव चव्हाण पञकारांनी सुचना केल्या.
तालुक्यातील प्रमुख आधिकारी गैरहजर ....
या शातांता बैठकीला उपविभागीय आधिकारी तहसिलदार, न.पा.चे मुख्यधिकारी, सा.बा.उपविभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, दारुबंदी अधिकारी हे माञ या बैठकीला गैरहजर होते. शांतता बैठकीला पोलिस निरक्षक पवार मनाठा पोलिस स्टशनचे सह्याक पोलिस निरक्षक विनोद चव्हाण आदीनी शाताता बैठकीत आपले विचार प्रगट केले. शेवटी आभार प्रदर्शन हदगाव पोलिस स्टेशन सह्याक पोलिस निरक्षक पाढरे यांनी अभार माणले. स्थानिक गोपनिय शाखेचे नागेश गायकवाड पोलिस तर होमगार्ड गणेश गिरबिडे त्यांच्या चमुने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

