हि परिस्थिती येऊ नये म्हणून गेल्यावर्षी केली होती बोगस बंधारे, नालासरळीकरणांची तक्रार
हिमायतनगर| तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस चालू आहे. या पावसाच्या पुरामुळे कमी उंचीचा नाला तथा (गावनदी) छोटा नाला सरळीकरणचे काम अर्धवट केल्यामुळे पुराचे पाणी जायला मार्ग नाही. त्यामुळे नाल्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची चौकशी करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी. आणि येथील पुलाची उंची वाढऊन नालासरळीकरनाचे अर्धवट काम पूर्ण करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेनंतर्गत नालासराळीकरण व अर्धवट (गावनदी) छोटा नाला सरळीकरन सुधार योजनेअंतर्गत बंधारे करण्यात आले. सदरील ठिकाणी २ बंधारे करण्यात आले मात्र ती सुद्धा अत्यंत बोगस पद्धतीने केल्या गेल्यामुळे आजघडीला परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सण २०२१ मध्ये शेतकरी राजाराम दत्तराव माने यांनी तक्रार देऊन बोगस कामाची चौकशी करून शेतकऱ्यावर येणारे संकट दूर करावे अशी मागणी केली होती.
या तक्रारीची दाखल घेऊन रोहयोचे उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी हिमायतनगर तहसीलदार यांना पात्र देऊन या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी उचित कार्यवाही करावी असे आदेशित केले होते. मात्र तहसीलदारांनी या संदर्भात कोणतीही चौकशी अथवा कार्यवाही न करता शेतकऱ्यांना अडचणीत सोडले आहे. त्यामुळे यंदाच्या अतिवृष्टीने कमी उंचीचे पूल आणि बोगस बंधाऱ्यामुळे शेतीपिकात पाणी साचून नुकसान झाले आहे. या नुकसानीची चौकशी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि येथील पुलाची उंची वाढऊन देऊन अर्धवट नालासरळीकरणाचे काम पूर्ण करून देऊन पुन्हा शेतकऱ्यावर असे संकट येणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी येथील शेतकरी राजाराम दत्ताराम माने व अनेकांनी केली आहे.
पारवा बु व कांडली मार्गाचा रस्ता रुंदीकरण होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अतिवृष्टीमुळे पडलेले खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाच्या अभियंत्याने चक्क मुरूम टाकून पुलावरील खड्डे बुजविल्याचे दाखवून दुरुस्तीचा निधी लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एव्हडेच नाहीतर रात्रीतून हे काम करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली असल्याचा आरोप शेतकरी राजाराम दत्ताराम माने यांनी केला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पुपलवाड यांच्याशी विचारणा केली असता अतिवृष्टीने पुलाचा भराव वाहून गेला होता जनतेला त्रास होऊ नये म्हणून आम्ही पुलावर भराव टाकला. आमच्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले हे म्हणणे चुकीचे असून, नैसर्गिक पुरामुळे त्यांच्या शेतीत पाणी आले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.