नांदेड| येथील सामाजिक कार्यकर्ते क्षितीज जाधव यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
खा. प्रताप पा. चिखलीकर यांचे खंदे समर्थक असलेले क्षितीज जाधव हे मागील अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. महापुरुषांची जयंती व अन्य कार्यक्रमानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवतात तर सामाजिक समस्या सोडविण्यासाठी ते पुढाकार घेतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत खा. प्रताप पा. चिखलीकर यांच्या सुचनेनुसार व भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या मार्गदर्शनाखाली क्षितीज जाधव यांच्याकडे जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली.
यावेळी महानगराध्यक्ष प्रविण साले, अशोक पा. धनेगावकर, विजय गंभीरे, अनिलसिंह हजारी, कुणाल गजभारे, संदिप कर्हाळे, नितेश (बंडू) पावडे, प्रशांत धाकपाडे, सचिन वाघमारे, रोहिदास पाटील, अरविंद गोधणे, राहुल सातव, वैभव गवळी, पंकज खाडे, धम्मा एडके, आकाश सातपुते, विक्की चव्हाण, प्रज्वल झिंझाडे, पवन जाधव, योगेश पुंडगे, कुणाल सावते, अभिषेक कासारकर, अभिजित पाईकराव, आकाश पुंडगे, नितेश टोकालवाड, अजय खंदारे, गोविंद पुंडगे आदींची उपस्थित होती.
जिल्हा चिटणीसपदी निवड केल्याबद्दल क्षितीज जाधव यांनी खा. प्रताप पा. चिखलीकर, महानगराध्यक्ष प्रविण साले यांचे आभार व्यक्त करत भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.