नांदेड। म.रा.कु.मराठा महासंघ प्रणित छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी नांदेड ( हदगांव ) चे राजकुमार भुसारे यांची काल सर्वानुमते नांदेड येथे संघाच्या कार्यकारिणी बैठकीत महाराष्ट्र राज्य संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्राचा आत्मा असलेल्या म.रा.कु.मराठा महासंघ प्रणित छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड च्या महाराष्ट्र संघटकपदी नांदेड जिल्ह्यातील हदगांवचे सकल मराठा सेवक, राज्य दैनिक बाळकडू नांदेड जिल्हा प्रतिनिधी , महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव व सामाजिक कार्यकर्ते राजकुमार भुसारे यांची छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांनी निवड करून नियुक्ती पत्र देवून, सन्मान व सत्कार केला,
नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे कोणतेही आंदोलन असो वा गोरगरीब, दिनदलित, दुबळ्या,अनाथ,अपंग, शेतकरी शेतमजूर, वंचित घटकांसह राजकुमार भुसारे यांनी आपल्या लेखनीतून व आपल्या खास कार्यशैलीत वाचा फोडण्यासाठी वेळोवेळी निर्भयपणे काम केले.गोरगरिबांना न्याय देताना आणि अन्यायाला वाचा फोडताना राजकुमार भुसारे यांची लेखणी कधीच मागे हटली नाही. असे या दमदार मजबूत आणि कर्तव्यकठोर , लोकप्रियता जिल्ह्यात व मराठवाड्यात नोंद घेण्यासारखी आहे अशा या लोकप्रिय व्यक्तीचे कौशल्य हेरून छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव व प्रदेश कार्याअध्यक्ष गजानन पाटील काहाळेकर यांनी राजकुमार भुसारे यांची महाराष्ट्र राज्य संघटकपदी नियुक्ती केली.
राजकीय नेते , विविध क्षेत्रातील मान्यवर , सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार मंडळी यांनी राजकुमार भुसारे यांच्यावर प्रत्यक्ष , सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव केला,यावेळी बोलताना लवकरच महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात , तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड संघटन मजबूत करण्यासाठी बैठका घेऊन नवनवीन नियुक्त्या जाहीर करण्यात येतील असे नवनियुक्त प्रदेश संघटक राजकुमार भुसारे यांनी सांगितले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.गिरीष भाऊ जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पा कहाळेकर, प्रदेश कोषाध्यक्ष संजय कदम, प्रदेश प्रवक्ते अँड. दिगांबर सुर्यवंशी, व्यंकटराव जाधव , कुणबी मराठा महासंघ नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवाजी पवार , उत्तर जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील खराटे, दक्षिण जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील ढाकणीकर,यशंवत पा.आव्हाळे जिल्हा कार्याअध्यक्ष , गुलाब कदम जिल्हा सचिव , जिल्हा प्रवक्ते प्रा. शशिकांत हटकर, जिल्हा सरचिटणीस वैजनाथ माने, गजानन दळवी , विकास कदम, ज्ञानेश्वर कदम, संतोष कपाटे, राम कदम, अवधूत कपाटे ,रामराव पवार, संतोष गायखे,कोडगिरवार, विजय कौडगावंकर , बळीराम हट्टेकर, बाळासाहेब थाटे यांच्यासह हजारो मावळे व छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.