बीड जिल्ह्यातील वडवणीतलं हे पहीलं कार्यालय, नगराध्यक्ष शेषेराव जगताप यांनी पत्रकारांच्या हक्काचं कार्यालय द्यावे - एस.एम.देशमख
वडवणी/बीड। वडवणी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शहरातील व तालुक्यातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना एस.एम देशमुख पुढे म्हणाले,वडवणी तालुक्यातील पत्रकारांसाठी कार्यालय झाले ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र पत्रकारांच्या अनेक अडचणी आहेत.मागील कोरोना काळात अनेक पत्रकार गेले.अनेक पत्रकारांना कामावरून काढून टाकले. अनेकांचं मानधन बंद केले.समाजाच्या पत्रकारांकडुन अनेक अपेक्षा असतात. गावातील असो वा शहरातील महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकारांना वेठीस धरले जाते.पत्रकारांना हे दिसत नाही का पत्रकारांना ते दिसत नाही का? असे प्रश्न निर्माण केले जातात. समाजातील विविध प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पत्रकार तुम्हाला सहकार्य करतो मात्र पत्रकारांवर जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र त्याच्या मदतीला कोणीच येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
आता नगराध्यक्ष शेषेराव जगताप यांनी दखल घेऊन वडवणी शहरात उभारण्यात आलेल्या शाॅपींग सेंटर मध्ये वडवणी शहरातील पत्रकारांसाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. दुसरीकडे बीड जिल्ह्यात अनेक विकासकामे झाली, नऊ महामार्ग निर्माण झाली, रेल्वे येतेय त्याची चर्चा मुंबईत होत नाही.मात्र बीड जिल्हा हा ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा आहे, मुलींना मारणारा जिल्हा आहे, शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा आहे. म्हणून बदनामी केली जाते.हा डाग पुसण्यासाठी विभागीय वृत्तपत्रांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. बीड जिल्हा कसा सुजलाम सुफलाम आहे हे मुंबईकरांना वाचण्यासाठी छापनं आवश्यक आहे.जोपर्यंत हा मॅसेज तिकडे जाणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरू होणार नाहीत. खरंतर वृत्तपत्रांनी नकारात्मकता बाजुला सारुन सकारात्मकता जोपासणे गरजेचे आहे. वडवणी येथील पत्रकार या मराठी पत्रकार परिषद
कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे प्रश्न, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शेतमजूरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतील असे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले.
सत्ताधाऱ्यांना सुचना देऊन वृत्त प्रकाशित करणारी पत्रकारीताच खरी - नगराध्यक्ष शेषेराव जगताप
एस एम देशमुख म्हणजे देवडी सारख्या गावातुन अलिबाग रायगड याठिकाणी जाऊन शुन्यातून आपलं अस्तित्व निर्माण करणारा व एका वेगळ्या उंचीवर गेलेला माणूस आपण नेहमी पाहतो कधी शरद पवार साहेब यांच्या सोबत, तर कधी उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत असतात आणि कधी फडणवीस साहेब यांच्या सोबत असतात सतत राज्यस्तरीय मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत त्यांची उठबस असते. याच एस एम देशमुख यांच्या बाजूने बसलो याचा मोठा आनंद आम्हाला वाटत आहे. एखादा माणूस उंचीवर गेला की तो हवेत जातो एस एम देशमुख यांचं मात्र वेगळं आहे ज्या मातीत आपला जन्म झाला ज्या लोकांमध्ये आपण लहानाचे मोठे झालो त्यांच्या साठी काही तरी करायची त्यांची तळमळ आम्ही पाहीली आहे.
आपल्या देवडी गावातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून बंधारा उभारला, वयोवृद्ध व्यक्तींना दृष्टी लाभावी म्हणून आरोग्य शिबीर भरवले होते, गावचे जेष्ठ नागरिक कै.माणिकराव देशमुख या त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी शाळेसाठी ई लर्निग सुविधा उपलब्ध करून दिली व माझ्या हस्ते शालेय साहित्य वाटप केले. एकंदरीत एस एम देशमुख सरांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. पत्रकार हा सतत सत्तेच्या विरोधी असतो हे खरे असले तरी त्यांनी कोणतेही वृत्त प्रकाशित करण्यापूर्वी सत्तेवर असलेल्यांना सुचना देऊन वृत्त प्रकाशित करावे असे सांगून नगराध्यक्ष शेषेराव जगताप यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या या कार्यालयासाठी शुभेच्छा दिल्या.
भाजपचे नेते सोमनाथराव बडे म्हणाले की, महाराष्ट्रातील वडवणी तालुक्यातील हे पहिले कार्यालय आहे.हा तालुका सरांचा तालुका आहे.सर्वांच्या हितासाठी हे कार्यालय उभारले आहे.जनतेची सेवा व्हावी.अशा शुभेच्छा भाजपचे नेते सोमनाथराव बडे यांनी व्यक्त केले..यावेळी उपनगराध्यक्ष बन्सी मुंडे,शिवसेनेचे नेते विनायक मुळे मनसे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, प्रा.श्रीराम मुंडे, ओबीसी चे नेते बी.एम.पवार, पोलिस निरीक्षक कांगुणे सह आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचा यथोचित सत्कार करुन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास नगराध्यक्ष शेषराव जगताप उपनगराध्यक्ष बन्सीभाऊ मुंडे, भाजप नेते प्राध्यापक सोमनाथ बडे, सभापती दिनेश मस्के, भाजपचे युवा नेते बाबरी मुंडे, शिवसेनेचे नेते विनायक मुळे,जिल्हा परिषदचे सदस्य औदुंबर सावंत, जेष्ठ नेते विनोदकुमार नहार, ओबीसी नेते बी. एम.पवार,मनसे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, राष्ट्रवादीचे नेते आनंद काळे, पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे,बीड जिल्हा कारागृहाचे जेलर श्री.वडणे साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष बजरंग साबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर निपटे, नगरसेवक भीमराव उजगरे, रोटरी क्लबचे जिल्हाध्यक्ष कल्याणराव कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार सुभाष वाव्हळ,नगरसेवक अस्लम कुरेशी, सभापती बाबा वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ पवार, भाजपचे नेते महादेव जमाले, युवा नेते सतीश गाडे, अमोल राठोड सर, ॲड मस्करे,
नारायणराव शेळके, चेअरमन सचिन लंगडे, भाजप नेते मच्छिंद्र झाटे,भाजप नेते बंडू नाईकवाडे, प्राध्यापक श्रीराम मुंडे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष ज्ञानदेव आंधळे,भाई महादेव उजगरे, संपादक जितेंद्र शिरसाट,संपादक विलास डोळसे,पत्रकार उदय नागरगोजे, पाटोदा तालुका अध्यक्ष सचिन पवार,नगरसेवक सचिन सानप, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष रामेश्वर सावंत, बाबासाहेब मुंडे, रोहयो माजी अध्यक्ष शिवाजी तौर, भाजपचे तालुकाध्यक्ष पोपट शेंडगे,युवा नेते बालासाहेब बादाडे, मानवी हक्क अभियान चे तालुका अध्यक्ष विष्णू मुजमुले, बहुजन वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष अविनाश झोडगे, युवा नेते मुन्ना मुंडे, संपादक गोवर्धन बडे, दक्षराज सौंदमल, किशोर पायके, अनिल पायके, अशोक मुजमुले, सचिन झोडगे, सचिन डोंगरे, अमर झोडगे, संदिपान खळगे, नितीन सव्वाशे, सुभाष राठोड, उपशहर प्रमुख विष्णू टकले, धनराज मुंडे, मधुकर ठोसर, भास्कर उजगरे, वैजनाथ जाधव, भाई महादेव उजगरे, ॲड गौतम भालेराव मित्र मंडळ जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे, ॲड.श्रीराम लंगे,
किसनराव माने, अँड शेख समशोदीन,ॲड महादेव गदळे,ॲड.संतोष पवार,ॲड.प्रताप उजगरे, ॲड.प्रकाश शिंदे,ॲड.दत्तात्रय चव्हाण, ॲड.प्रमोद तिडके,ॲड.महादेव आडे, प्राध्यापक वैजनाथ शिंदे, दत्ता माने,भैय्यासाहेब गदळे,ॲड.शाम थोटे, वैजनाथ राऊत,उतरेश्रर खताळ, सरपंच देशमुख,भैय्यासाहेब वसंत काकडे सह आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद राज्य कार्यकारिणी सदस्य संपादक अनिल वाघमारे, तालुका अध्यक्ष विनायक जाधव, माजी अध्यक्ष सुधाकर पोटभरे, सरचिटणीस सतिश सोनवणे, कोषाध्यक्ष शांतीनाथ जैन, पत्रकार महेश सदरे,पत्रकार ओमप्रकाश साबळे,पत्रकार हरी पवार, पत्रकार धम्मपाल डावरे,पत्रकार शंकर झाडे,पत्रकार अर्जुन मुंडे,पत्रकार अंकुश गवळी,
पत्रकार वाजेद पठाण, पत्रकार शेख एजाज,पत्रकार उंडाळकर सह आदींनी परिश्रम घेतले. प्रारंभी स्थानिक शाखेचे अध्यक्ष विनायक जाधव यांनी प्रास्ताविक केले तर परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे यांनी आभार मानले.