‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी देशात कायदा करावा !- अधिवक्ता उमेश शर्मा -NNL

‘...अखेर 'वंदे मातरम्’ ला विरोध कधीपर्यंत ?’ या संदर्भात ‘विशेष संवाद’ !


मुंबई।
वंदे मातरम्’ला वर्ष 1909 या वर्षी मुस्लिम लीगने प्रथम विरोध केला आणि ‘वंदे मातरम्’ला विरोध करणारे 1947 ला भारताची फाळणी करून दुसर्‍या देशात म्हणजे पाकिस्तानात गेले. ‘वंदे मातरम्’ हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहेज्याला देशातील प्रत्येक नागरिकाने मान्य केले पाहिजेअन्यथा आपल्याला देशाचे नागरिक म्हणून घेण्याचा काही अधिकार नाही. ‘वंदे मातरम्’ या गीतात भारतमातेचा सन्मान असून याला विरोध करणार्‍यांना भारतमातेचा सन्मान करायचा नाही. ‘वंदे मातरम्’ला विरोध म्हणजे राष्ट्रविरोध आहे. ‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी देशात कायदा केला पाहिजेअशी मागणी ‘सर्वाेच्च न्यायालया’तील अधिवक्ता उमेश शर्मा यांनी केलीहिंदु जनजागृती समिती आयोजित ‘...अखेर 'वंदे मातरम्’ला विरोध कधीपर्यंत ?’ या विषयावरील ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

या वेळी बिहार येथील ‘भारतीय जनक्रांती दला’चे महासचिव अधिवक्ता राकेश दत्त मिश्रा म्हणाले, ‘वंदे मातरम्’ हे असे गीत आहेज्यामुळे आपल्या देशाप्रती सन्मानाची भावना निर्माण होतेज्यांना देशाप्रती आस्था नाहीतेच याला विरोध करू शकतातराष्ट्रीय गीत आणि राष्ट्राचा सन्मान जे करत नाहीतत्यांची नागरिकता त्वरित रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा कायदा या देशात लागू केला पाहिजेतसेच ‘वंदे मातरम्’ला विरोध करणारे आमदारखासदार किंवा त्यांचे जे काही राजकीय पद असेलते सुद्धा काढून घेतले पाहिजे.’

या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्रीअभय वर्तक म्हणाले की, ‘वंदे मातरम्’वर त्यावेळी इंग्रजांनी बंदी आणली असतानाही ‘वंदे मातरम्’ म्हणत देशातील अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी बलिदान दिले आणि फासावर चढले. ‘वंदे मातरम्’ला विरोध करणारे इंग्रजांची भाषा बोलत आहेत. ‘वंदे मातरम्’ला संविधानात राष्ट्रगीताचा दर्जा देऊन त्याची अशी जागा निर्माण केली पाहिजे कीत्याला विरोध करण्याची कोणाची हिंमत होणार नाही.

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,(संपर्क : 99879 66666)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी