नांदेड। आषाढी एकादशीनिमित्त नांदेड येथे 10 जुलै रोजी भव्य माऊली दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माऊली दिंडीचे मुख्य संयोजक डॉ रमेश नारलावार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय संस्कृती व परंपरेनुसार आषाढी एकादशीचे महत्व, वारकरी संप्रदाय व इतर सर्व हिंदू समाज यांना अधिक आहे. जे भाविक भक्त आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, त्यांना पंढरपुरच्या यात्रेचे दर्शन व आनंद देण्याचा माऊली दिंडीच्या माध्यमातून हा एक छोटासा प्रयत्न आहे असे सांगून डॉ. रमेश नारलावार यांनी या दिंडी सोहळ्यात नांदेड मधिल भाविक भक्त तसेच सर्व धर्मातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.नारलावार यांनी केले. १० जूलै २०२२ रविवार रोजी या दिंडीची शोभायात्रा दुपारी ३-४५ वाजता विठ्ठल रुक्माई मंदिर,संत नामदेव मंदिर (गायत्री मंदीराजवळ) नविन
पुलाखाली येथुन निघुन मोंढा येथील टॉवर जवळून हनुमान टेकडी, महावीर चौक हनुमान मंदीर, मारवाडी धर्मशाळा, कलामंदिर व स्वामी समर्थ मंदीर पर्यन्त जाणार आहे,तेथे महाप्रसादाने सांगता होणार आहे.मोठ्या संख्येने सामील व्हा व या सोहळ्याचे आनंदयात्री व्हावे असे आवाहन डॉक्टर रमेश नारलावार,गणेश ठाकूर ,मोहन पाटील,राहुल दारावार , शंकरराव शिंगेवार,डॉक्टर तळणकर ,पंढरी महाराज मुरकुटे ,मुन्ना बजाज यांनी केले आहे. शोभायात्रेत ड्रेसकोड म्हणून पांढरा शर्ट/पांढरी पॅन्ट/धोतर व टोपी असल्यास समोर उभे राहता येणार आहे.
या शोभायात्रेत वारकरी कीर्तनकार मंडळी ,वारकरी मुलांचा (२५) एक संच आम्ही बाहेर गावातून बोलावलं आहे.यात नांदेड मधील महिला भजनी मंडळ ,सालासार भजनी मंडळ व डॉक्टर्स ,वकील,इंजिनिर ,प्रोफेसर ,व्यापारी बंधू व समाजातील सर्व स्तरातील लोक येतील .साधारण यात्रे मध्ये १५०० लोक सहभागी होतील असे डॉ नारलावार यांनी सांगितले. या निमित्ताने हिंदू संस्कृती व एकतेचे दर्शन घडवणे हे सुद्धा महत्वाचे आहे. यात जैन ,बुद्ध,शीख ,व इतर सर्व हिंदू समाज एकत्र आणण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत,जे की आज समाज व देश हितासाठी आवश्यक आहे असे वाटते .खरे हिंदुत्व म्हणजे माणूसकी जपणे व इतरांसाठी त्याग करणे हेच आहे. हा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे ,हाही उद्देश आहे.ह्या यात्रेतून प्लास्टिक वापरू नये हा ही सामाजिक संदेश आम्ही स्लोगनमाध्यमातून समाजा समोर नेत आहोत असे डॉ रमेश नारलावार यांनी यावेळी सांगितले.