नांदेड| प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-तिरुपती आणि औरंगाबाद-तिरुपती दरम्यान विशेष गाडीच्या आठ फेऱ्या करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे -
अनु क्र. | गाडीक्र. | कुठून – कुठे | प्रस्थान | आगमन | दिनांक |
1 | 07633 | नांदेड-तिरुपती (शनि) | 12.00 | 08.30 (रवी) | 30 जुलै, 2022 |
2 | 07634 | तिरुपती – नांदेड (रवि) | 21.10 | 17.20 (सोम) | 31 जुलै, 2022 |
3 | 07637 | तिरुपती – औरंगाबाद (रवि) | 07.00 | 11.00 (सोम) | 7, 14, 21 ऑगस्ट, 2022 |
4 | 07638 | औरंगाबाद-तिरुपती (सोम) | 23.05 | 03.00 (बुध) | 8, 15, 22 ऑगस्ट, , 2022 |
1. गाडी संख्या 07633/07634 नांदेड-तिरुपती-नांदेड विशेष गाडी ( 02 फेऱ्या) :
आपल्या प्रवासात या गाड्या पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चात्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, कृष्णा, रायचूर , मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुती, तादिपात्री, यार्रागुंतला, कडप्पा, आणि रेणीगुंठा या रेल्वे स्थानकांवर या गाड्या थांबतील.
2. गाडी संख्या 07637 / 07638 तिरुपती-औरंगाबाद-तिरुपती विशेष गाडी (06 फेऱ्या) :
आपल्या प्रवासात या गाड्या रेणीगुंठा, गुडूर, नेल्लोर, ओंगोल, चीराला, बापटला, तेनाली, गुंटूर, सातेनापल्ली नाडीकुडी, मिर्याल्गुडा, नालगोंडा, सिकंदराबाद, लिंगमपल्ली , विकाराबाद, झहीराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, सेलू, परतूर आणि जालना या रेल्वे स्थानकांवर या गाड्या थांबतील. या गाडीमध्ये वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल चे डब्बे असतील.