आरक्षण मिळाल्याबद्दल काँग्रेस पक्षाने साजरा केला आनंदोत्सव
नांदेड, अनिल मादसवार| महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून बांठिया आयोगाची स्थापना करण्यात आली होती. मागील काही महिन्यांपासून इंपेरिकल डाटा जमा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने रात्रीचा दिवस करुन डाटा संकलित केला. आणि हा डाटा सर्वोच्च न्यायालयांनी मान्य करुन ओबीसीना आरक्षण दिले. यासाठी महाविकास आघाडी सरकारने केलेले प्रयत्न कामी आले असून या सरकारमुळेच ओबीसीला आरक्षण मिळाले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री डी.पी.सावंत यांनी केले.
काँग्रेस पक्षाच्या जिल्हा व शहर ओबीसी सेलच्यावतीने ओबीसी आरक्षण मिळाल्याबद्दल येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर फटाक्याची आतिषबाजी व एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या आनंदोत्सवाचे आयोजन ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव व शहराध्यक्ष विजय देवडे यांनी केले होते.
यावेळी बोलताना डी.पी.सावंत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या ट्रीपल टेस्टच्या आदेशानंतर महाविकास आघाडी सरकारने बांठिया आयोगाची स्थापना केली. या आयोगाने रात्रं-दिवस काम केले. अहवाल पूर्ण झाल्यानंतर तो न्यायालयात सादर झाला. दरम्यानच्या काळात सत्तांतर झाले. आठ दिवसांपूर्वी सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकार याचे श्रेय घेवू शकत नाहीत. यापुढे मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा काँग्रेस पक्षाचा लढा सुरु असेल असेही ते म्हणाले. यावेळी महापौर सौ.जयश्रीताई पावडे, जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, शहराध्यक्ष विजय देवडे, प्रवक्ते संतोष पांडागळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान ढगे, माजी सभापती लक्ष्मण जाधव यांनी आपले विचार मांडले.
आजच्या या आनंदोत्सव सोहळ्यास जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, बाळासाहेब रावणगावकर, अपर्णा नेरलकर, विजय येवनकर, श्रावण रॅपनवाड, डॉ.रेखा चव्हाण, सुमती व्याहाळकर, सुरेंद्र घोडजकर, गंगाधर सोंडारे, आनंद चव्हाण, उमेश चव्हाण, जे.पी. पाटील, विरेंद्रसिंघ गाडीवाले, अनिल मोरे, नामदेव आईलवाड, बालाजी इबितदार, मुन्ना अब्बास, मारोती पाटील शंखतीर्थकर, उध्दव पवार, बालाजी गव्हाणे, रंगनाथ भुजबळ,विनोद कांचनगिरे, बाळू धुमाळ, निळकंठ मदने, डॉ.माणिक जाधव,दिपक पाटील,किशन कल्याणकर, ललिता कुंभार, जयश्री राठोड, अरुणा पुरी, जयश्री जयस्वाल, राजेश बेंबरे, प्रा.सुनिल पांचाळ, शिल्पा नरवाडे, सुनंदा पाटील, सुभाष पाटील, गंगाप्रसाद काकडे, संजय पांपटवार, प्रशांत तिडके, राजू शेट्टे, नागोराव वाघमारे, उमाकांत पवार, बाबूराव खाकरे, संतोष बारसे, बालाजी भंडारे,गोविंद फेसाटे, व्यंकटराव पार्डीकर, पांडुरंग रावणपल्ले, साहेबराव राठोड, साहेबराव सावंत, गोरख राऊत,महेश मगर,हरविंदरसिंघ संधू, भानूसिंग रावत, संतोष महाजन आदींची उपस्थिती होती.