खैरगाव सोसायटीच्या चेअरमनपदी बालाजी पा. गव्हाणे तर व्हाईस चेअरमन पदी बालाजी कल्याणकर बिनविरोध -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने।
खैरगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बालाजी पाटील गव्हाणे तर व्हाईस चेअरमन पदी बालाजी कल्याणकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी एस.एस.जळके यांनी केली.

खैरगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन , व्हाईस चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक दि.१ शुक्रवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चेअरमन पदासाठी बालाजी पाटील गव्हाणे , तर व्हाईस चेअरमन पदासाठी बालाजी कल्याणकर , यांनी उमेदवारी दाखल केले होते.  चेअरमन, व्हाईस चेअरमन पदासाठी दोनच अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्जाच्या छाननी नंतर निवडणूक निर्वाचन अधिकारी यांनी चेअरमन पदी बालाजी पाटील गव्हाणे , व्हाईस चेअरमन पदी बालाजी कल्याणकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी एस.एस.जळके , सहाय्यक सखाराम पवार यांनी केली.

सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बालाजी पाटील गव्हाणे , व्हाईस चेअरमन पदी बालाजी कल्याणकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजयराव देशमुख लहानकर , नगराध्यक्ष छत्रपती कानोडे , काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश्वर शेटे , नगरसेवक प्रविण देशमुख,सचीव निळकंठराव मदने, व्यंकटी राऊत , डॉ. विशाल लंगडे , आर.आर.देशमुख , पंडितराव लंगडे , पत्रकार लक्ष्मीकांत मुळे, गुणवंत विरकर , शंकरराव ढगे , प्रा.मुख्तारोद्दिन काजी , राजाराम पवार , दत्ता नादरे , संजय गोंवंदे , राजू गायकवाड , गोपाल पंडित , नवनाथ ढगे , प्रदिप हिवराळे , मनोज कदम  आदींनी चेअरमन बालाजी पाटील गव्हाणे व व्हाईस चेअरमन बालाजी कल्याणकर यांच्या निवडीचे जल्लोषात सत्कार करत स्वागत केले .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी