सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना सेवायोजन प्रमाणपत्र अद्यावत करण्याचे आवाहन -NNL


नांदेड|
शासनाच्या पूर्वीच्या रोजगार व स्वयंरोजगार व सध्याच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोकरी इच्छूक सुशिक्षित बेरोजगारांनी नाव नोंदणी केली आहे. त्या उमेदवारांनी नाव नोंदणीला आधार कार्ड लिंक करुन घ्यावेत. 

उमेदवारांनी आपले नाव नोंदणीला आधार कार्ड, शैक्षणिक पात्रता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी लिंक करुन माहीत अद्यावत करावी. त्यामुळे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत घेण्यात येणारे रोजगार मेळावे, दिले जाणारे प्रशिक्षण याचा लाभ उमेदवारांना घेता येईल, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी