नांदेड| औरंगाबाद येथील डॉ.अदिती नागेश नागापूरकर यांच्या ‘डाईव्ह डीप’ या काव्य संग्रहास आंतरराष्ट्रीय स्तरावरील ईमीली डीकीन्सन ऍवार्ड नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
डॉ.अदिती नागापूरकर हिने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून गायनाकॉलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तीला कविता करण्याचा छंद असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेत असतांना तीने भारत, अमेरिका आणि इंग्लंडमध्ये झालेल्या अनेक काव्य संमेलनांमध्ये व काव्य स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
अलिकडेच अदिती नागापूरकर हिचा डाईव्ह डीप हा काव्य संग्रह प्रकाशित झाला आहे. तीच्या या साहित्यिक कार्याबद्दल तीला ईमीली डीकीन्सन ऍवार्ड नुकताच प्रदान करण्यात आला आहे. अदितीचे आई व वडील दोघेही डॉक्टर आहेत. तीचे वडील डॉ.नागेश नागापूरकर यांना नाट्य व संगित क्षेत्राची आवड आहे.