नांदेड| साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट रोजी नांदेड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष भारत खडसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
दि. १० जुलै रोजी अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात समाजभूषण शंकरराव वाघमारे यांच्या अध्क्षतेखाली समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.
या बैठकीत जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भारत खडसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उर्वरित कार्यकारीणीमध्ये उपाध्यक्षपदी सोनाजी वाघमारे, सचिव साहेबराव वाघमारे, सहसचिव विठ्ठल बोरीकर, संघटक शशिकांत तादलापूरकर, सल्लागार गणेश तादलापूरकर, ईश्वरअण्णा जाधव, सचिन वाघमारे, सुनील जाधव, प्रसिद्धी प्रमुख उत्तम गायकवाड, रमेश भालेराव सदस्य उमाजी रेड्डी, दिलीप गायकवाड, देवांनद जांभळे, रतन कांबळे, बाबु वाघमारे आदींची निवड करण्यात आली आहे.
ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस दिलीप जमदाडे, सत्यदिप गायकवाड, बालाजी कांबळे, विजय वाघमारे, परमेश्वर गाडे, शिवाजी रेड्डी, वैष्णवी गायकवाड, पवन जाधव, डोम्पले ज्ञानेश्वर आदींची उपस्थिती होती.