‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास संचालक पदी डॉ. सूर्यप्रकाश जाधव रुजू -NNL


नांदेड।
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक पदी हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील प्रो. डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांची निवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केली आहे. ते आज दि.  जुलै रोजी त्यांच्या विभागात रुजू झाले आहे. त्यांनी प्र-संचालक प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांच्याकडून कार्यभार स्वीकारला आहे.

डॉ. जाधव हे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. हिमायतनगर येथील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयमध्ये ते मराठी विभागाचे प्रमुख आहेत. गेल्या १७ वर्षापासून ते ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हे त्यांचे अभ्यास क्षेत्र आहे. गेली दहा वर्षापासून ते विद्यापीठातल्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत होते. त्यांचा अनुभव आणि आवडीचा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाला निश्चितच फायदा होईल अशी अशाही त्यांनी रुजू होते वेळी व्यक्त केली. 

त्यांच्या या निवडीमुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत भोसले,मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, प्रा.डॉ. वैजनाथ अनमुलवाड, प्रा. विश्वाधर देशमुख, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. शिवराज शिंदे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी