नांदेड| साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा जयंती मंडळाची बैठक रविवार, दि. १० जुलै २०२२ रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष भारत खडसे यांनी दिली आहे.
मागील दोन वर्षापासून संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट असल्यामुळे शासनाने विविध सण, उत्सव साजरे करण्यासाठी निर्बंध घातलेे होते. आता कोरोना महामारीवर काही प्रमाणात आळा बसल्यामुळे सण, उत्सव साजरे करण्यासाठी शासनाने नियमात शिथिलता आणली असून त्या पार्श्वभूमीवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा १०२ वा जयंती सोहळा १ ऑगस्ट २०२२ रोजी सार्वजनिक स्तरावर विविध भरगच्च कार्यक्रमासह साजरा करण्याचा मानस असून जिल्ह्यातील सार्वजनिक संयोजन समिती निवड करण्यासाठी दि. १० जुलै २०२२ रोजी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
अण्णाभाऊ साठे जयंती अनुषंगाने व्याख्यानमाला, निबंध स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच कलावंत, शाहीर, पत्रकार, सामाजिक चळवळीत कार्य करणार्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार असून त्या अनुषंगाने दि. १० जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता अण्णाभाऊ साठे चौक परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील बैठकीस समाज बांधव व सर्व संघटनेच्या पदाधिकार्यांनी उपस्थित राहून जयंती अनुषंगाने आपल्या सूचना व मार्गदर्शन करावे असे आवाहन भारत खडसे यांनी केले आहे.