ज्येष्ठ नागरिकांच्या व्यापक बैठकिस उत्तम प्रतिसाद -NNL


नांदेड।
सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबादच्या वतीने घेण्यात आलेल्या व्यापक बैठकिस उत्तम प्रतिसाद मिळाला. करोना काळाच्या प्रतिबंधना नंतर घेण्यात आलेली ही पहिलीच बैठक होती. बैठकिस खूप दूरुन दूरून तथा दुर्गम भागातून मोठ्या संख्येनी ज्येष्ठ महिला पुरूषांची उपस्थिती होती.

सर्व प्रथम ज्येष्ठांच्या हृदयद्राक भावना ऐकून घेण्यात आल्या. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना यथोचित मार्ग मार्गदर्शन रा.नि.देशमुख, देशमुख तरोडेकर, कुंटूरकर, ज्येष्ठ पत्रकारमाधवराव पवार काटकळंबेकर, श्रीमती प्रभा चौधरी यांनीं फेस्कॉम या संघटने बद्दल व कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. संघटनेचे बळ व महत्व विषद केले. शेवटी अध्यक्षीय समारोप नांदेड भूषण डॉ.हंसराज वैद्य यांनीं केला.
ते पुढे म्हणाले की, मागील युती सरकार असो की महाआघाडी सरकार असो, ज्येष्ठांची त्यांनी प्रतारणाच केली. कोणत्याही शासन काळात ज्येष्ठांच्या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक न पाहण्यातच धन्यता मानली. 

खरंतर आता ज्येष्ठत्व बणण्याचा दर केवळ राज्यात, देशातच नाही तर जागतिक पातळीवरही लहान बालकांच्या जनन दरापेक्षाही जास्तच आहे ही वस्तूस्तिती आहे. या पुढे कुठल्याही राष्ट्राची सुबत्ता, समृद्धी, संस्कृति, पुढारलेपण तथा विकास हा त्या देशातला ज्येष्ठ नागरिकांच्या आवस्थेवर नागरिक कसा आहे? तो कसे जीवन जगतो? यावर ठरले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक समूह म्हणजे समाजाचा आरसाच ठरणार आहे. समाजाचा एक सर्वात अनुभवी, विश्वासू, सुसंस्कृत व्यक्ती समूह, समाजाचा उत्तम मार्ग दर्शक, शिल्पकार प्रत्येक कुटूंबात किमान एक ते पाच ( स्वतः, तो त्याची पत्नी, आजोबा आजी असे पाच) तसेच एक ज्येष्ठ हा किमान सहा मतांचा हुकमी एक्काच आहे. तेंव्हा ज्येष्ठ नागरिकांना नाराज करून आता चालणार नाही. तो संविधानाच्या 141 व्या कलमाप्रमाणे न्याय मागतो. 

ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण एकून जन संख्येच्या 18 टक्के एवढी आहे. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिड कोटीच्या घरात आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक जागतिक व देशातिल इतर राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकाप्रमाणे वागणूक व न्यायिक हक्क मागतो आहे. राज्यात आता नविन सरकार स्थापण झालेले आहे. किमान या नविन शासनाने तरी ज्येष्ठांच्या प्रलंबित प्रश्नांची दखल घेऊन न्याय द्यावा नाही तर सर्व ज्येष्ठ नागरीकांना रस्त्यावर उतरल्या शिवाय गत्यांतरच राहणार नाही असा इशाराही त्यानी दिला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी