५ आरोपीसह सव्वा सहा लाखांचा ऐवज ताब्यात
अर्धापूर, निळकंठ मदने| अर्धापूरहुन नांदेड येथे गोरे व बैलांची कतल करण्यासाठी नांदेडला ५ वेगवेगळ्या वाहनातून जात असतांना शनीवारी भोकरफाटा येथे २ वा च्या सुमारास गोवंशहत्या विरोधी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीवरून अर्धापूर पोलीसांना ही कारवाई केली.
शनीवारी भोकरफाटा येथे पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे यांच्या पथकाने टाटा कंपनीचे एसीई मॅडेल चे ५ वाहने त्यात जवान ३ गोरे व २ बैल असा एकूण सव्वासहा लाखांचा दस्ताऐवज अर्धापूर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.आरोपींना सोडविण्यासाठी अनेक मातब्बरांनी पोलिस ठाणे गाठले आहे.
अर्धापूर मार्गे जनावरांच्या कतलीसाठी नांदेड ला नेहमी बनावट दाखले बनवून अनेक ट्रक जात असतात. आता पोलीसांची करडी नजर लागल्याने या साखळीतील मातब्बर कोणती निती अवलंबविणार आहेत. हे लवकरच दिसणार आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक तपास पोलिस उपनिरीक्षक कपील आगलावे हे करीत आहेत.