उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मौजे येळी ता.लोहा येथील शिवारातील गोदावरी नदी घाटावर गोदावरी नदीच्या पात्रातील पाण्यात अनोळखी एक पुरुष जातीच्या इसमाचे प्रेत तरंगत असल्याचे आढळून आले असून उस्माननगरपोलिस स्टेशन येथे खबरीच्या तक्रारी वरून आ.म्र.नं.१७/२०२२ नुसार कलम १७४ सी.आर.पी.सी.प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सपोनि देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.एन. श्रीमंगले हे तपास करीत आहेत.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रासह परिसरात मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले होते.या संततधार पावसामुळे नदी- नाल्याना पुरपरिस्थीती निर्माण झाली होती.पो.स्टे.अंतर्गत येणाऱ्या मौजे येळी ता.लोहा येथील भगवान गणपती सोमवारे वय (३४ ) वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १८/५/२०२२ रोजी पो.स्टे.ला येऊन खबर दिली की , मौजे येळी शिवार गोदावरी नदी घाटावर गोदावरी नदीच्या पात्रातील पाण्यात एक पुरुष जातीचे प्रेत तरंगत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी उस्माननगर पोलिस ठाण्यात दि.१८/५/२०२२ रोजी आ.म्र.नं.१७/२०२२ कलम १७४ सी.आर. पी.सी.प्रमाणे गुन्हा दाखल केला असून स.पो.नि.देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक एन.आर. श्रीमंगले तपास करीत असून सदर अनोळखी मयताचे वर्णन शरीर बांधा - मध्यम ( पाण्यात पडून फुगलेला, सडलेला) ,वय -३० ते३५ वर्ष अंदाजे ,उंची - १६५ सेमी. , चेहरा - गोल ( पाण्यात पडून फुगलेला सडलेला ) अंगावरील कपडे :- पिवळ्या रंगाचे फुल भायाचे शर्ट , काळ्या रंगाची व त्यास लाल किनार असलेली हाफ बनीयान ,काळ्या रंगाची पॅन्ट ; उजव्या हाताचे पोटरीवर राजेश नाव गोदलेले व मनगटावर लाल ,काळा दोरा व भगव्या रंगाचे मण्याचा बांधलेला दोरा, कमरेला - लाल करदोडा आहे.वरील वर्णनाचे अनोळखी मयत ईसमाचे पो.स्टे.हद्दीतून मिसिंग झाला असल्यास किंवा नमुद मयताचे नातलगाचा व मयताचा आप आपले हद्दीतून ताबे पोलीसा मार्फत शोध घेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले असून पो.ना.एन.आर. श्रीमंगले मो.नं.9511645433 व पो.नि. श्री.डी.देवकते मो.नं.९३०७३४३४३४ यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.