हिमायतनगर। येथील चौपाटी परिसरात असलेल्या मस्जिद कॉम्प्लेक्स मध्ये कांग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालूका अध्यक्ष फेरोज खूरेशी यांच्या गोल्ड फिटनेस जिमचे उद्घाटन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
बुधवारी सायंकाळी 5 वाजता या गोल्ड फिटनेस जिमचे फीत कापून आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी उद्घाटन केलं. यावेळी कृऊबाचे माजी संचालक रफिक सेठ, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, दत्ता शिराने, अनिल मादसवार, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जनार्धन ताडेवाड, माजी नगरसेवक शे रहीम पटेल, माजी जीप सदस्य समद खान, रोजगार स्वयंरोजगार समितीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कोमावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण, अश्रफ भाई, बाखी सेठ, हमीद सर, असद मौलाना, मुजीब खान, अफरोज कुरेशी, अमजद कुरेशी, यांच्यासह मोठया प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते, व युवक मंडळी, बांधव उपस्थित होते.