आषाढी निमित्ताने हिमायतनगरात खरीप हंगामासहा सुख समृद्धीची प्रार्थना -NNL

परंपरेनुसार टाळ - मृदंगाच्या गजरात वाढोणा शहराभोवती नगरप्रदक्षिणा दिंडी   


हिमायतनगर,अनिल मादसवार| यंदाचा खरीप हंगामवर्ष सुख समृद्धीचा होओ आणि जगावर ओढवलेल्या कोरोना महामारीच्या संकटातून मुक्ती मिळावी... अशी प्रार्थना करून आज एकादशी दिनी शेकडो भाविकांनी विठ्ठल रुखमाई व श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन पुण्यप्राप्त केले आहे. सायंकाळी परंपरेनुसार शहरातील भजनी मंडळ व वारकरी महिला - पुरुष भक्तांनी टाळ - मृदंग आणि विठू नामाच्या गजरात शहराला नगरप्रदक्षिणा घालून पंढरपूरच्या पाई वारीचा आनंद घेतला आहे. 



श्रीक्षेत्र असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर व बोरगडी येथील विठ्ठल मंदिरात पंढरपूर यात्रा आणि आषाढी एकादशी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. गेल्या चार दिवसापासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे, अशातही दि.१० जुलै आलेल्या आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी संप्रदायीक महिला - पुरुष, भाविक, बालकांनी विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठल रुख्माई आणि श्री परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती. सायंकाळी परंपरेनुसार  येथील भजनी मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या नगर प्रदक्षिणा दिंडीला ४ वाजता सुरुवात झाली. दिंडीपूर्वी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर अनादिकालापासून चालत आलेली परंपरा राखत विठू नामाचा गजर करीत, टाळ - मृदंगाच्या वाणीत शहरातून नगरप्रदक्षिणा दिंडी काढली. 


दरम्यान शहराच्या गावाबाहेरील व शहरातील सर्व मंदिरातील देवी - देवतांचे दर्शन घेऊन पंढरपूर यात्रेला गेल्याचा काहींसा अनुभव दिंडीत सामील झालेल्यां भाविकानी घेतला आहे. भर पावसातही टाळ -मृदंगाच्या गजरात व भजनी मंडळाच्या आवाजाने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आषाढी एकादशी दिनी नगर प्रदक्षिणा काढण्याची हि परंपरा मागील शेकडो वर्षापासून मंदिर समितीच्या पुढाकारातून अविरतपणे सुरु असून, भजन गीते व प्रसाद वाटपाने दिंडीचा समारोप श्री परमेश्वर मंदिरात परत येउन करण्यात आला असल्याची माहिती मंदिराचे लिपिक बाबुराव भोयर गुरुजी यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. 

नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणा आणि ढिसाळ नियोजन


येथील नगरपंचायत अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली खोदून ठेवल्याने शहरातील खड्डेमय आणि चिखलमय झाले आहेत. या खड्डेमय घाण पाण्यात चिखलात रुतलेल्या रस्त्याने नगरप्रदक्षिणा दिंडीला जावे लागले आहे. त्यामुळे दिंडीत सामील झालेल्या महिला - पुरुष भाविकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणा आणि ढिसाळ नियोजनाच्या बाबतीत तीव्र संताप व्यक्त केला आहे. आता तर सॅन - उत्सवाची रेलचेल सुरु झाली आहे, त्यामुळे यापुढे शहरातील धार्मिक कार्यक्रमात अडथळा निर्माण होणार नाही आणि भक्तांना चिखल आणि घाणीचा समान करण्याची वेळ येऊ नये रस्ताही नगरपंचायतीने तातडीने शहरातील रस्ते दुरुस्त करून घ्यावे अशी रस्ता अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी